🌟भारतात सोन्याच्या दरात उसळी सोने 90 हजारांच्या उंबरठ्यावर : सोन्याचा दर प्रती तोळा 88,100 रुपयांच्या वर🌟
🔴राज्यभरात आजपासून 12 वीची परीक्षा सुरू, इंग्रजीचा पहिला पेपर कुठे उत्साहात, कुठे दडपणात
🔴शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शेगाव येथे मस्कुजी बिरुजी बिरूंगले महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर दिली भेट
🔴सरकारचं कॉपीमुक्त अभियान जोमात, पहिल्या दिवशी 42 केंदांवर कॉपीचा गैरप्रकार
🔴बारावी परीक्षेत कॉपीसाठी मदत करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई होणार, केंद्राची मान्यताही रद्द होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश
🔴सरपंच संतोष देशमुखांची लेक डोंगराएवढं दु:ख बाजूला सारुन परीक्षेला,बारावीचा आज पहिला पेपर दिला.
🔴देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 3 मोठे निर्णय; जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेसाठी 438 कोटी, बारामती,दौंड आणि पुरंदरमधील शेतकऱ्यांना फायदा
🔴मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले,पालक सचिवांच्या कामागिरीवर नाराजी; मंत्रालयातूनच जिल्ह्यात जाण्याचे निर्देश नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ अण्णांचा आदेश,
🔴तानाजी सावंतांच्या लेकाच्या विमानाचा हवेतच यू टर्न, लँडिंगनंतर ऋषीराज सावंतला समजलं, बँकॉक नव्हे, आपण पुण्यातच पोहोचलो ; ऋषीराज सावंत यांची 8 दिवसांपूर्वी दुबईवारी आता 68 लाखांचं बिल पप्पा रागावतील म्हणून न सांगताच घरातून गेले
🔴उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व मंत्री अदिती तटकरेंनी अंधारात ठेवून रायगडची बैठक आटोपली ? शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे संतापून म्हणाले, जाणीवपूर्वक आम्हाला बैठकीला बोलावलं नाही ; शिंदे गटाचे रायगड जिल्ह्यातील आमदार रागाने खवळले, अजित पवारांच्या कार्यालयाकडून तातडीचं स्पष्टीकरण, म्हणाले, जिल्ह्याला पालकमंत्री नाहीत म्हणून आम्ही केवळ मंत्र्यांना बैठकीसाठी बोलावले
🔴आपत्ती व्यवस्थापन समितीमधुन वगळल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नाराजीमुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निर्णय फिरवला, आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वाईल्ड कार्ड एन्ट्री ; आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समावेश
🔴नाशिकमध्ये शिंदेंच्या सभेसाठी जास्तीत जास्त शिवसैनिक आणा, आमदार सुहास कांदे माजी नगरसेवकांवर भडकले; शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर
🔴हिमालयात संत महात्मा खूप, त्यांचा मला काय उपयोग असं म्हटल्यानंतर छनग भुजबळांवर भाजपचा पलटवार, तुमच्याच पक्षाने तुम्हाला हिमालयात पाठवायची व्यवस्था केलीय; अध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसलेंची भुजबळांवर बोचरी टीका
🔴आरोप झाल्यावर लगेच राजीनामे घेण्याची काँग्रेसची पद्धत चुकीची, 'राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम'; अशोक चव्हाणांचे वक्तव्य
🔴राज्यात भ्रष्टाचाराचे इतके स्फोट, गेल्या 10 वर्षात अण्णा हजारेंनी राळेगणमध्ये कूसही बदलली नाही ; संजय राऊतांनी डागली तोफ ; आधी अरविंद केजरीवालांना सुनावलं आता अण्णा हजारेंनी उद्धव ठाकरे अन् संजय राऊतांवरही केला पलटवार म्हणाले, ज्या रंगाचा चष्मा तसंच जग दिसतं
🔴वसईत बहीण-भावाची 15 दिवसांपूर्वीच आत्महत्या,डोक्यावर 25 लाखांचं कर्ज,राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडताच वसई हादरली
🔴कठडा नसलेल्या विहिरीत कार कोसळली, 3 तरुणांचा बुडून मृत्यू, नागपूरमधील बुटीबोरीत खळबळ
🔴लाडक्या बहिणींना राज्य सरकारचा झटका ; अपात्र महिलांची नावे वगळण्यास सुरुवात चारचाकीवाल्यांच्या घरी जाऊन सर्व्हे पुण्यात 75 हजार 100 महिलांच्या घरी दिसली कार
🔴मुंबई पोलिसांचा समय रैनाला फोन, India's got Latent कार्यक्रमातील अश्लील वक्तव्यावरुन संयोजकांच्या अडचणी वाढल्या
🔴प्रदर्शनापूर्वीच सिनेमाता 3 कट्स, 7 बदल अन् 161 मिनटं 50 सेकंदांचा सर्टिफाईड रनटाईम; 'छावा'वर सेन्सॉरची कात्री
🔴अमिरेकेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टील व अल्युमिनियमच्या सर्व आयातीवर 25 कर आकारण्याचा निर्णय घेतल्याने भारतात सोन्याच्या दरात उसळी, सोने 90 हजारांच्या उंबरठ्यावर ( 88,100 वर ) अठ्ठ्याऐशी हजार शंभर रुपये...
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या