🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथे बाळशास्त्री जांभेकर यांची २१३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.....!


🌟यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताडकळस मराठी पत्रकार संघटनेचे मार्गदर्शक शिवाजी शिराळे हे होते🌟

पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्नीत ताडकळस मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज गुरुवार दि.२० फेब्रुवारी रोजी ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात मराठी पत्रकारीतेचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्री जांभेकर यांची २१३ वी जयंती ऊत्साहात साजरी करण्यात आली. 

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताडकळस मराठी पत्रकार संघटनेचे मार्गदर्शक शिवाजी शिराळे तर प्रमुख पाहुणे म्हणून ताडकळस ग्रामपंचायतीचे माजी सदस्य राजेंद्र मगरे हे होते तर सर्व प्रथम दर्पणकार बाळशास्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ताडकळस पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष देवानंद नावकिकर, उपाध्यक्ष शमीम पठाण,सल्लागार धम्मपाल हनवते,सहसचिव सचिन सोनकांबळे, बाजार समितीचे कर्मचारी माधव रोडगे, दत्तराव जाधव,दत्तराव धनवटे,कृष्णा बनसोडे आदी पत्रकार बांधवांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मपाल हानवते यांनी तर आभारप्रर्दशन मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष देवानंद नावकिकर यांनी मानले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या