🌟पुर्णा शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती उत्साहात साजरी....!


🌟शहरात शिवजन्मोत्सव मिरवणूक पारंपरिक पद्धतीने ढोल ताशा,टाळ,मृदंगाच्या गजरात निघाली भव्य मिरवणूक🌟


 
पुर्णा (दि.१९ फेब्रुवारी २०२५) :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक बहुजन प्रतिपालक जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती शहरासह तालुक्यात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आली पुर्णा शहरात सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक पारंपारिक पद्धतीने ढोल,ताशा,टाळ, मृदंगाच्या गजरात हत्ती घोडे बैलगाड्यासह सजिव देखाव्यांसह काढण्यात आली .

पुर्णा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरातील महादेव मंदिर देवस्थान येथून सकाळी १०.०० वाजता उत्साहात शिवजन्मोत्सव मिरवणुकीचा सुरुवात करण्यात आली मिरवणूक पुर्व पूर्णेतील जेष्ठ माजी नगराध्यक्ष उत्तमरावजी कदम,डॉ.विनय वाघमारे,पुर्णा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक विलास घोबाळे  गूरुबुध्दीस्वामी महाविद्यालयाचे प्राचार्य राजकुमार यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून शिवरायांना विनम्र अभिवादन करुन मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला या शिवजन्मोत्सव शोभायात्रेत मुख्य आकर्षण नांदेड येथील जगदंबा ढोल ताशा हे होते तर तालुक्यातील ताडकळस व निळा येथील मुलींचे लेझीम पथक देखील शिवजन्मोत्सव शोभायात्रेत सहभागी झाले होते 

 भव्य अशा या निघालेल्या शिवजन्मोत्सव शोभायात्रेत शहरातील नागरिक व महिला व बालगोपाळ पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते या मिरवणुकीत माजी नगराध्यक्ष विशाल कदम,माजी नगरसेवक श्याम कदम,बंडूभाऊ कदम,विजयराव कदम,शिवजयंती महोत्सव  समितीचे अध्यक्ष कोस्तुभ कदम,जेष्ठ पत्रकार जगदीश जोगदंड, शिवसेना उबाठा शहरप्रमुख मुंजा कदम,डॉ.गुलाबराव इंगोले,अतुल शहाणे,मराठा समन्वयक  ज्ञानोबा कदम,अमृत कदम  अंकीत कदम,भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत कापसे,बालाजी कदम भाजपचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मीकांत कदम आदी मान्यवरासह इतर नागरिक भजनी मंडळी महिला व लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ही मिरवणूक महादेव मंदिर इथून निघून अंबानगरी,श्री गुरु बुध्दीस्वामी मठ परिसर,महाराणा प्रतापसिंह चौक,दत्तमंदिर परिसर,संत नरहरी महाराज चौक मुख्य बाजारपेठ मार्गाने शिवतीर्थावरील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ आल्यानंतर छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले यानंतर पुन्हा मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली यानंतर शिवजन्मोत्सव मिरवणूक महात्मा बसवेश्वर चौक व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने दोन्ही महापुरुषांना अभिवादन करण्यात आले यानंतर भव्य शिवजन्मोत्सव मिरवणूक परत छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरातील महादेव मंदीर संस्थान पोहोचल्यावर या ठिकाणी निवडणुकीचे विसर्जन करण्यात आले यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता एकूण आजची ही मिरवणूक अत्यंत शिस्तीने व शांततेने पार पडली.

पुर्णा तालुक्यातील आहेरवाडीत शिवजयंती साजरी :-

आहेरवाडी येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जय॓ती उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे उदघाटन छगनराव मोरे यांच्या हस्ते केले अध्यक्ष शालेय शिक्षण समिति अध्यक्ष ग॓गाधर मोरे,,ऋषीभाऊ मोरे पोलीस पाटील बालाजी मोरे,, सदाशिव मोरे, सुभाष मोरे,, ग्राम पंचायत सदस्य ग॓गाधर मोरे विलास मोरे,, मुख्याध्यापक सुर्यव॓शी सर,,शि॓दे,सर,,देवकते सर विशेष परिश्रम घेऊन येथील विद्यार्थ्यांकडून ५२ गडकिल्ले तयार करण्यात आले होते.

 या देखाव्याचे उदघाटन छगनराव मोरे या॓नी केले तर गड किल्ले तयार करण्यासाठी मार्गदर्शन  जि प. शाळेचे शिक्षक गिते  व सर्व शिक्षक शिक्षिकांनी केले  व विद्यार्थ्यांनी या मध्ये प्रचंड मैहनत घेत हे बावन ऐतिहासिक किल्ले  साकारले होते.यावेळेस काही  विद्यार्थिनीनीं खुप छान भाषणे केली या कार्यक्रमात गावकरी म॓डळी मोठ्या स॓खेने उपस्थीत होते......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या