🌟मानव विकास सायकल वाटप योजना गैरव्यवहार चौकशी अहवालातील दोषींना पाठीशी घालण्याचा गंभीर प्रकार...!


🌟परभणी जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यावर दोषींना पाठीशी घालण्याचा केला आरोप🌟 

🌟प्रहार जनशक्ती पक्ष जनहित याचिका दाखल करणार🌟


परभणी : प्रहार जनशक्ती पक्ष परभणीच्या वतीने दि. ०५ डिसेंबर २०२३ रोजी दिलेल्या तक्रारीनुसार मानव विकास योजनेअंतर्गत सायकल वाटप योजनेत अनियमितता असुन या योजनेपासुन अनेक लाभार्थी मुली वंचित राहिल्या त्या शिवाय महाराष्ट्र शासन नियोजन विभाग शासन निर्णय दिनांक १६ फेब्रुवारी २०२२ नुसार संबंधीत योजनेत सायकलचे पैसे लाभार्थी विद्यार्थीच्या खात्यावर (DBT) वर्ग करणे बंधनकारक असतानाही रक्कम मुख्याध्यापकांच्या खात्यावर वर्ग केली हे शासन निर्णयाचे उलंघन करणारी बाब आहे वरील प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तक्रार दाखल केली होती.

चार सदस्यीय चौकशी समितीने दिनांक ०७ मे २०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे सादर केला. संबंधीत चौकशी अहवालामध्ये शासन निर्णय दि. १७ फेब्रुवारी २०२२ चे उलंघन करण्यात आले असल्याचे तसेच चौकशी अहवालातील मुद्दा क्र. ०४ नुसार ५० लाख १ हजार ३७२ रुपये इतक्या रक्कमेचा हिशोब जुळत नसल्याबाबत तसेच संबंधीत योजनेचे अभिलेखे उपलब्ध नसल्याबाबत अहवालात नमुद करण्यात आले आहे तसेच संबंधीत प्रकरणात तत्कालीन शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) श्रीमती आशा गरुड व कंत्राटी वरिष्ठ सहाय्यक लेखा श्री. विजय राठोड यांच्यासह १५ मुख्याध्यापक या अनियमिततेस जबाबदार असुन त्यांच्यावर कार्यवाही करण्यावाचत स्पष्ट नमुद केले आहे.

असे असतांनाही जिल्हाधिकारी परभणी यांनी वरील प्रकरणी चौकशी अहवाल सादर झाल्यानंतर संबंधीतांवर तात्काळ कार्यवाही करणे अपेक्षित होते असे न करता या बाबत सुनावणी घेऊन दि. ०६ जानेवारी २०२५ रोजी उपसंचालक शिक्षण विभाग संभाजी नगर यांना स्वतंत्र अहवाल सादर करुन ज्या ५० लाख १ हजार ३७२ रुपये इतक्या रक्कमेचा अपहार झाल्याबाबत क्लिनचिट देण्याचे काम करण्यात आले. जिल्हाधिकारी हे जिल्हा मानव विकास समितीचे अध्यक्ष असतानाही त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना कार्यवाही अधिकार नाही मग त्यांनी या प्रकरणात क्लिनचिट देण्याचा प्रयत्न करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.

वरील प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणात चौकशी समितीने गैर व्यवहारास जबाबदार धरलेल्या व्यक्तींना पाठीशी घालण्याचे काम केले आहे असे स्पष्ट दिसुन येत आहे. याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने लवकरच जनहित याचिका दाखल करुन वरील प्रकरणातील दोषर्षीवर कार्यवाही करण्याबाबत दाद मागणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या