🌟मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्व आरोपींवर मकोकासह हत्येचा गुन्हा....!


🌟मयत सरपंच देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिली प्रसार माध्यमांना माहिती🌟

बिड :- महाराष्ट्र राज्यात सर्वत्र खळबळ माजवलेल्या बिड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख निर्घृण हत्याकांड प्रकरणात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर मकोका दाखल झालेला आहे मात्र त्याच्यावर संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाचा गुन्हा दाखल झाला की नाही स्पष्ट झाले नव्हते या संदर्भात मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत सर्वच आरोपींवर संतोष देशमुख हत्येचा गुन्हा आणि मकोका दाखल झाल्याचं स्पष्ट केलं.

मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी शुक्रवार दि.०७ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री सीआयडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन तपासाचा आढावा घेतला त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की दोन-तीन दिवसाला मी सीआयडी ऑफिसला येत असतो आपल्याकडे काही माहिती असेल तर ती पुरवली जाते आणि तपासाबद्दल माहिती घेतली जाते. तपासाचा आढावा घेणं आपलं काम आहे. सीआयडीचे अनिल गुजर यांच्यासोबत चर्चा झाली.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्व आरोपींवर निर्घृण हत्येचा गुन्हा :-

वाल्मिक कराडवरील खुनाच्या गुन्ह्याबद्दल धनंजय देशमुख यांना विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले, तुम्ही रिमांड कॉपी बघितलं तर सगळं स्पष्ट होईल. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला, ही गोष्ट स्पष्ट आहे. ३०२चं नवीन कलम १०३ लागलं आहे. खुनाच्या गुन्ह्यातच मकोका लागलेला आहे.

तसेच १२० ब कटकारस्थान रचल्याचं कलम लागलं आहे आणि मकोका; हे चार गुन्हे सर्व आरोपींवर लागलेले आहेत. यात कुठलाही आरोपी सुटलेला नाही.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा :-

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अद्याप थेटपणे देशमुख कुटुंबियांनी केलेली नाही. त्याबद्दल विचारलं असता, धनंजय देशमुख म्हणाले की, ज्यांनी आरोपींना पोसलंय, ज्यांनी पाठबळ दिलंय, ज्यांचे आरोपीसोबत संबंध आहेत, त्या सगळ्यांवर कारवाई करण्याची आमची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांकडेही आम्ही तीच मागणी केलेली आहे. मुख्यमंत्री हेच गृहमंत्री आणि जबाबदार व्यक्ती आहेत. त्यांनीच या प्रकरणात आम्हाला न्याय द्यावा आणि ठोस पावलं उचलावीत. मागच्या सात तारखेला आम्ही मुख्यमंत्र्यांकडे हीच मागणी केली होती. आज महिना लोटला आहे. आमची त्यांना पुन्हा विनंती असून तपासामध्ये येणारा कुठलाही अडसर, याबाबत विचार करा आणि आम्हाला न्याय द्या.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या