🌟गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीचा अद्यापही शोध सुरू🌟
नांदेड :- नांदेड शहरातील गुरुद्वारा गेट क्रमांक सहा परिसरातल्या शहिदपुरा शहीदपूरा भागात दि.१० फेब्रुवारी २०२५ रोजी स.सत्येद्रसिंघ संधू यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेला व पॅरोलवर आलेला गुन्हेगार गुरमितसिंघ सेवादार व त्याचा मित्र रविंद्रसिंघ राठोड यांच्यावर गोळीबाराची घटना घडली होती या गोळीबाराच्या घटनेत रविंद्रसिंघ राठोड याचा मृत्यू झाला होता तर पॅरोलवर सुटलेला गुरमितसिंघ सेवादार हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी नांदेड पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून या घटनेतील मुख्य आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेला गुरमितसिंघ सेवादार हा सोमवार दि.१० फेब्रुवारी २०२५:रोजी सकाळी आपला मित्र रविंद्रसिंघ राठोड याच्या समवेत गुरुद्वारा गेट नंबर सहा समोरील शहीदपूरा भागातून जात असतांना दुचाकीवर आलेल्या एका आरोपीने त्याच्यावर गोळ्या झाडल्या या गोळीबाराच्या घटनेत गुरमितसिंघ सेवादार व रविंद्रसिंघ राठोड हे दोघेही गंभीर जखमी झाले रुग्णालयात उपचारा दरम्यान रविंद्रसिंघ राठोड याचा मृत्यू झाला गोळीबाराच्या घटनेमुळे गुरुद्वारा परिसरात खळबळ उडाली होती.
याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुध्द वजिराबाद पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी गुन्ह्याचा तपास सुरु केला होता. गुरुद्वारा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपी हा एका दुचाकीवरुन जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले पोलीसांनी आरोपीला मदत करणारे मनप्रीतसिंघ उर्फ मन्नु गुरुबक्षसिंघ ढिल्लो (वय ३१) राहणार शहीदपूरा नांदेड तसेच हरप्रितसिंघ उर्फ हॅप्पी बाबुसिंघ कारपेंटर (वय २५) राहणार शहीदपूरा नांदेड या दोघांना अटक केली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत......
0 टिप्पण्या