🌟नांदेड येथील वजिराबाद पोलिसांची धाडसी कारवाई : गावठी पिस्टल विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघांना केली मुद्देमालासह अटक....!


🌟कारवाईत तीन गावठी पिस्टल सात जीवंत काडतुस असा एकंदर १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त🌟

नांदेड (दि.२८ फेब्रुवारी २०२५) :- नांदेड शहरातील हिंगोली गेट भागातल्या फटाका मैदानावर गावठी पिस्टल विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघाना वजिराबाद पोलीसांनी काल गुरुवार दि.२७ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळच्या सुमारास मोठ्या शिताफीने अटक केली असून त्यांच्या जवळून तीन गावठी पिस्टल आणि सात जीवंत काडतुस असा एकंदर १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल वजिराबाद पोलिसांनी जप्त केला आहे.

नांदेड शहरात गावठी पिस्टल विक्री करणारे काही गुन्हेगार सक्रीय आहेत. अशा गुन्हेगारांवर पोलीसांनी आपला मोर्चा वळविला असून त्यांच्यावर कारवाईचे सत्र सुरु केले आहे. फटाका मैदानावर दोन इसम गावठी पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वजिराबाद पोलीसांना मिळाली. पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव, पोलीस उपअधीक्षक सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली वजिराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक श्री. कदम व पोलीस कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी सापळा रचून गावठी पिस्टल विक्रीसाठी आलेल्या रोहित नरेंद्र ताटीपामुलवार (वय २०) राहणार अंबड ह.मु. भावेशनगर चौफाळा नांदेड व भागवत विष्णू डोंगरे (वय ३०) राहणार बाजीउमर तालुका जालना ह.मु. भावेशनगर,चौफाळा नांदेड या दोघांना अटक केली त्यांच्याकडून तीन गावठी पिस्टल व सात जीवंत काडतुस पोलीसांनी जप्त केले. पोलीस जमादार शिवसांब मठपती यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वजिराबाद पोलीस ठाण्यात दोन जणांविरुध्द भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या