🌟पुर्णेतील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त प्रश्नमंजुषा......!


🌟या प्रश्न मंजुषेत एकूण 9 संघांनी सहभाग घेतला या संघाला किल्ल्याचे नावं देण्यात आले होते🌟

पुर्णा :- पुर्णा येथील श्री गुरु बुद्धिस्वामी  महाविद्यातील इतिहास विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रश्न मंजुषेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. राजकुमार उपप्राचार्य डॉ.शिवसांब कापसे,डॉ.विजय पवार,कार्यालयीन अधीक्षक श्री बाळासाहेब कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यकमाचे प्रास्ताविक इतिहास विभागाचे डॉ. सोमनाथ गुंजकर यांनी केले. या प्रश्न मंजुषेत एकूण 9 संघांनी सहभाग घेतला या संघाला किल्ल्याचे नावं देण्यात आले होते प्रत्येक संघात 3 विद्यार्थ्यांचा समावेश होता.

प्रश्न मंजुषेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपण,जावळी प्रकरण, अफजलखान प्रकरण, शाहिस्तेखान प्रकरण, आग्रा भेट, राज्यभिषेक, कर्नाटक मोहीम, किल्ले यांचे हुबेहूब प्रसंग चार फेऱ्याच्या मार्फत विदयार्थ्यांच्या उत्तरातून साकार करण्यात आले या प्रश्नमंजुषेत प्रथम बक्षीस रतनगड या संघाला मिळाले तर द्वितीय बक्षीस शिवनेरी संघाला मिळाले विजेत्या संघाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. राजकुमार यांनी रोख बक्षीस दिले.प्रश्न अतिशय चांगल्या प्रकारे डॉ. अंबिका चोंडे व डॉ. ओमकार चिंचोले यांनी विचारले तर परीक्षक म्हणून डॉ. वृषाली आंबटकर, डॉ. रेखा पाटील यांनी कार्य पार पाडले या प्रसंगी  डॉ. धुतमल,डॉ. स्वामी,डॉ. शिंदे,प्रा. आसोरे डॉ. इडॊळे, डॉ. बगाटे डॉ. शेळके महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षेत्तर कर्मचारी विद्यार्थी यांची उपस्थिती होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या