🌟पुर्णेतील स्वा.सै.सूर्यभानजी पवार महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात उद्घाटनप्रसंगी बोलतांना ते म्हणाले🌟
पुर्णा (दि.०६ फेब्रुवारी २०२५) :- ग्रंथालय सेवेतील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मानवी विकासासाठी करावा असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले ते येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयाच्या एक दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्रात उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
यावेळी स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार हे होते पुढे बोलताना कुलगुरू डॉ . इंद्र मणी म्हणाले की महाराष्ट्रातील मराठवाडा ही संत महंतांची प्रेमळ भूमी आहे. माझी आवध भाषा आणि मराठी भाषा यांची जवळीकता असून मला या भाषा संस्कृतीचे आदान प्रदान करायला आनंद वाटतो .
आजच्या काळात ग्रंथालयीन सेवेत होणारे बदल आपण स्वीकारले पाहिजेत रोबोट या तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक ग्रंथालय सेवा सक्षम केली पाहिजे. सुविज्ञानाशिवाय आपण कोणत्याच क्षेत्रात प्रगती करू शकणार नाहीत म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ग्रंथालयीन सेवेत नवे पाऊल टाकून ग्रंथालय सेवेच्या नवनवीन बदलांचे स्वागत करण्यासाठी ग्रंथालय चळवळीतल्या आपण सर्वांनी सज्ज राहिले पाहिजे असेही त्यांनी आपल्या उदघाटकीय मार्गदर्शनात सांगितले.
याप्रसंगी स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना जीवन गौरव व ग्रंथ मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले डॉ.मोहन खेरडे ,डॉ. नंदकुमार दहिभाते,डॉ. राजेंद्र कुंभार,डॉ.धर्मराज वीर,डॉ.विलास पाटील,डॉ. उदय खोडके,डॉ.एस.एम.खळीकर,दगडूजी शिंदे यांना विविध सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर ग्रंथालय सेवेतील योगदानाबद्दल डॉ.सुभाष चव्हाण, खंडेराव सरनाईक व डॉ.मंजीरी दुबे यांना ग्रंथमित्र पुरस्कार देण्यात आला.याप्रसंगी विचार मंचावर डॉ. वनिता काळे ,सुनील हुस्से, राम मेकाले, किरण धाडोंरे ,नंदकिशोर मोतेवार ,माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
या चर्चासत्राच्या बीज भाषणात सावित्रीबाई फुले विद्यापीठ ,पुणेचे ज्ञान स्त्रोत केंद्राचे माजी संचालक डॉ.राजेंद्र कुंभार यांनी आपल्या बीज भाषणात कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे आणि तोटे यावर सविस्तर असे भाष्य केले वाचन आणि वाचन संस्कृती जगली तरच ग्रंथपाल टिकेल म्हणून ग्रंथपालांनी वाचन सल्लागाराची भूमिका घेतली पाहिजे असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
यावेळी नांदेड उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर ,डॉ.विलास पाटील, महाराष्ट्र राज्याचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, डॉ. मोहन खेरडे, इंजिनिअर अविनाश कोठाळे, गजानन कोटेवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समोरापात प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार यांनी चर्चा सत्राची भूमिका विषद केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय चर्चासत्राचे समन्वयक डॉ. अशोक कोलंबीकर यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.संजय कसाब, प्रा. डॉ. दीपमाला पाटोदे यांनी केले तर आभार प्रा. दत्ता पवार यांनी मांडले. या चर्चासत्रासाठी देशातील विविध विभागातून 150 प्रतिनिधी सहभागी झाले होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले........
0 टिप्पण्या