🌟या भूकंपाचे केंद्र कोलकाता शहरापासून खूप दूर होते🌟
कोलकाता/भुवनेश्वर : बंगालच्या उपसागरात काल मंगळवार दि.२५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ०६.०० वाजेच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ५.१ इतकी नोंदवण्यात आली भूकंपाने पश्चिम बंगालमधील कोलकातासह अनेक शहरे हादरली.
भूकंपाचा केंद्रबिंदू बंगालच्या उपसागरात ९१ किलोमीटर खोलीवर होता. भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची माहिती अद्याप मिळालेली नाही. या भूकंपाचे केंद्र कोलकाता शहरापासून खूप दूर होते. यावर्षी ८ जानेवारीला तिबेट आणि नेपाळच्या काही भागांमध्ये शक्तिशाली भूकंप झाल्यानंतर कोलकातामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते.
0 टिप्पण्या