🌟महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या......!


🌟पुण्यातील खडकी पोलीस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षकाने उचललं टोकाचं पाऊल ; लोणावळ्यात गळफास घेऊन आत्महत्या🌟

💫लाडकी बहीण योजनेची स्क्रूटिनी 15 दिवसांपासून सुरू; आत्तापर्यंत अपात्र ठरलेल्या 5 लाख लाभार्थी महिलांना योजनेतून वगळले ;  अपात्र असलेल्या लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेण्यासाठी 'हेड' तयार, राज्य सरकारचा मोठा निर्णय 

💫महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये 5 महिन्यात 39 लाख मतदार वाढले,  राहुल गांधींचा सवाल, सुप्रिया सुळे, संजय राऊतांच्या उपस्थितीत दिल्लीत पत्रकार परिषद, डेटा देत 5 गंभीर सवाल ; राहुल गांधींकडून गंभीर आरोप, निवडणूक आयोगाचं उत्तर; आयोगाकडून तथ्यात्मक आणि प्रक्रियात्मक मॅट्रिक्ससह लेखी स्वरूपात प्रतिसाद मिळणार 

💫उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचा शिंदेसेनेचा दावा, उदय सामंतांचं ऑपरेशन टायगरबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले, टप्प्याटप्प्याने प्रवेश होणार ; टायगर जिंदा है, वज्रमूठ मजूबत, 100 टक्के आम्ही कुठंच जाणार नाही, पत्रकार परिषद घेत ठाकरेंच्या अरविंद सावंतांचा 7 खासदारांच्या साक्षीनं शब्द 

💫छत्रपती संभाजीनगर मधील काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांना अटक,अजिंठा बँक गैरव्यवहार प्रकरणी कारवाई ! बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी, सुजय विखे पाटील दाखल करणार जनहित याचिका, म्हणाले, वकिलांचा सल्ला घेऊन न्यायालयात जाणार 

💫मी तोंड उघडलं तर धनंजय काय पंकजा मुंडेंचंही मंत्रिपद जाईल, करुणा शर्मांचा थेट इशारा, म्हणाल्या, माझ्या मुलामुलींना माझ्याविरोधात उभ केलं जातय

💫परीक्षा केंद्रावर हत्यारबंद बंदोबस्त द्या, अन्यथा आमचा संतोष देशमुख होईल;  12 वी परीक्षेदरम्यान परभणीतील उपप्राचार्यांकडून भीती व्यक्त 

💫पुण्यातील खडकी पोलीस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षकाने उचललं टोकाचं पाऊल ; लोणावळ्यात गळफास घेऊन आत्महत्या, टायगर पाईंटजवळ आढळली कार,कारमध्ये डायरी 

💫पुण्यात दुचाकी चालकाचा पोलिसावर हल्ला,डोक्यात घातला दगड, फरार आरोपीचा शोध सुरू 

💫तुम्हाला यायचं तर या,नाहीतर यायची गरज नाही, पण हा खटला सुरूच राहणार; बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांच्या भूमिकेवर हायकोर्टाचा मोठा निर्णय 

💫नाशिकमधील नामवंत बिल्डरच्या घरावर गोळीबार अन् दगडफेक; परिसरात थरार, हल्लेखोर फरार 

💫जळगावमध्ये इमारतीमध्ये चाचणीवेळी नव्या लिफ्टचा रोप तुटला, एकाचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर! 

💫'राजा शिवाजी' भूमिकेतील रितेश देशमुखचा फर्स्ट लूक समोर, अभिषेक बच्चनसह 3 दिग्गज बॉलिवूड अभिनेते साकारणार मुघलांची भूमिका 

💫अभिनेता स्वप्नील जोशी कुंभमेळ्यात, गंगेत डुबकी; दैवी आशीर्वाद म्हणत डोळ्यात आनंदाश्रू 

💫भारतीय लष्कराकडून तीन सैनिकांसह 7 पाकिस्तानींचा खात्मा, BAT टीमचा चौकीवर हल्ला करण्याचा डाव फसला 

💫'पती-पत्नीच्या वादात पतीच्या नातेवाईकांना विनाकारण आरोपी करता येणार नाही'-- सर्वोच्च न्यायालय 

💫आरबीआयकडून रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटने कपात, कर्ज स्वस्त होणार, रेपो रेट 6.25 टक्क्यांवर

💫सोन्या चांदीचे दर विक्रमी पातळीवर, खरेदीदारांना मोठा दणका, 10 ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागतात 87 हजार रुपये 

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या