🌟सचखंड गुरुद्वारा परिसरात शिख समुदायाच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करुन दिल्लीतील ॲव्हेन्यू कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत🌟
श्री हजुर साहेब नांदेड :- पंजाब राज्यातील अमृतसर येथील पवित्र'अकाल तख्त' मध्ये दिवंगत इंदिरा गांधींनी केलेल्या ऑपरेशन ब्ल्यू स्टार कारवाई नंतर ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी दिल्लीत इंदिरा गांधी यांची त्यांच्या शिख अंगरक्षकांकडून झालेल्या हत्येनंतर दिल्लीत सर्वत्र दंगलसदृश परिस्थिती निर्माण करुन 'खुन का बदला खुन' चा नारा देत तत्कालीन कॉंग्रेसी दंगलखोर टोळक्याकडून सुनियोजित पद्धतीने हजारों निर्दोष शिखांचे जलियांवाला बाग हत्याकांडालाही लाजवेल असे अमानुषपणे हत्याकांड घडविण्यात आले होते यावेळी दंगलखोर नराधम टोळ्यांचे नेतृत्व तत्कालीन कॉंग्रेस नेता माजी खासदार सज्जनकुमार,जगदीश टाईटलर,एच.के.एल.भगत या त्रिकुटांसह त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी केले होते.
दिल्लीत १ नोव्हेंबर १९८४ रोजी उसळलेल्या शिख विरोधी दंगलीत सरस्वती विहारमध्ये स.जसवंत सिंग व स.तरुणदीप सिंग या दोन निरपराध शिख धर्मिय पितापुत्रांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती या हत्या प्रकरणात दिल्लीतील ॲव्हेन्यू न्यायालयाने कॉंग्रेस नेता सज्जन कुमार याला काल मंगळवार दि.२५ फेब्रुवारी २०२५ रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली ॲव्हेन्यू न्यायालयाने तत्कालीन राजकीय दहशतवादी सज्जन कुमार याला सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेचे श्री हजुर साहेब नांदेड येथील शिख समुदायाने जोरदार स्वागत करीत आज बुधवार दि.२६ फेब्रुवारी रोजी येथील पवित्र तख्त सचखंड गुरुद्वारा परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करीत स्वागत केले असून स्थानिक शिख समुदायाच्या वतीने न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतांना बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स.मनबीरसिंघ ग्रंथी म्हणाले की दिल्ली येथील ॲव्हेन्यू न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.
सन्माननीय न्यायालयाने ४१ वर्षांनी का होत नाही परंतु निरपराध शिख हत्याकांडातील पिडित परिवारांना न्याय दिला परंतु दिल्ली उच्च न्यायालयासह ॲव्हेन्यू न्यायालयाला आमची विनंती आहे दिल्ली शिख हत्याकांडातील दोषी सज्जन कुमार याच्यासह दिल्ली शिख कांडातील त्याच्या सहकारी गुन्हेगारांना न्यायालयाने फाशीचीच शिक्षा द्यायला हवी यावेळी असेही स.मनबीरसिंघ ग्रंथी म्हणाले या जल्लोशावेळी स.दिपकसिंघ गल्लीवाले,स.बिरेंदसिंघ बेदी,स.बंदीछोड सिंघ खालसा,स.महेलसिंघ लांगरी,स.जरनैल सिंघ गाडीवाले,स.अमोलकसिंघ गल्लीवाले,स.बक्षीसिंघ पुजारी,स.जसबीरसिंघ हुंदल आदींसह असंख्य शिख बांधवांची उपस्थिती होती....
.
0 टिप्पण्या