🌟भारतीय डाक विभागामार्फत ग्रामीण डाक सेवक पदाची पदे भरणार..‌‌.!


🌟पात्र व इच्छुक उमेदवारांनी ३ मार्च पर्यंत https://indiapostgdson line.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावे🌟

मुंबई : भारतीय डाक विभागामार्फत अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक पदासाठी (२१ रिक्त पदे) भरली जाणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी ३ मार्च २०२५ पर्यंत व त्यापूर्वी https://indiapostgdson line.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावे.

असे आवाहन नवी मुंबई विभाग, वाशीचे वरिष्ठ अधीक्षक डाकघर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. उमेदवाराने अर्ज ऑनलाइन पद्धतीद्वारे करणे आवश्यक आहे. कोणत्याही अन्य माध्यमाद्वारे आलेले व व्यक्तिशः आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अधिसूचने मध्ये नमूद केलेल्या सूचनांनुसार शुल्क भरणे आवश्यक आहे. पोस्ट विभाग उमेदवारांना कोणताही फोनकॉल करत नाही. संबंधित प्राधिकरणाद्वारेच उमेदवारांशी, पत्रव्यवहार, केला जातो. उमेदवारांनी त्यांची वैयक्तिक माहिती, नोंदणी क्रमांक, मोबाइल क्रमांक, ईमेल आयडी इतरांसमोर उघड करू नयेत आणि कोणत्याही अवैध फोन कॉल्सपासून सावध राहावे, अधिक माहितीसाठी www.indiapostgdsonli

ne.gov.in संकेस्थळास भेट द्यावी. नियम व अटी वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या