🌟महाराष्ट्रातून टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या सचिवपदी रणजित चामले...!


🌟यावेळी भारतातील २० राज्यांचे ४० प्रतिनिधी हजर होते🌟


परभणी (दि.१३ फेब्रुवारी २०२५) : महाराष्ट्रातून टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या सचिवपदी प्रा.रणजित चामले यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली मागील चार वर्षांची मुदत संपल्यामुळे रविवार दि.०९ फेब्रुवारी २०२५ रोजी टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया निवडणूक प्रक्रिया पार पडली श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात बालेवाडीच्या सभागृहात सकाळी ०९.०० ते ०१.०० वाजेपर्यंत ही प्रक्रिया पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी रमेश शेलार यांनी काम पाहिले यावेळी भारतातील २० राज्यांचे ४० प्रतिनिधी हजर होते. प्रत्येक राज्य संघटनेचे दोन प्रतिनिधींना मतदार करण्याचा अधिकार होता. यात सर्व सहमतीने पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली.

या कार्यकारणीमध्ये अध्यक्षपदी नागेश्‍वर राव, कर्नाटक, सचिवपदी प्रा. रणजित चामले, महाराष्ट्र पुणे,कोषाध्यक्ष तृषाली बारिया, (गुजरात), उपाध्यक्ष प्रियानंदा एन. (मणिपूर), प्रतापसिंह (गुजरात), शशिकांता नायक (ओरिसा) तर  सहसचिव एस. सांबा शिवा राव (आंध्र प्रदेश), सुरेश रेड्डी (महाराष्ट्), ब्रजेश प्रसाद (झारखंड), प्रदीप केशवानी( मध्य प्रदेश) यांची निवड झाली. तसेच सदस्य म्हणून सौ. निहारिका सियात, (गुजरात), आर. विजय, (तामिळनाडू), जयशंकर गुप्ता, (बिहार), जी. जी. एस. वाराप्रसाद (तेलंगाणा), कु. निकिता (दिल्ली), कु. सुशमा राय (कर्नाटक), जॉन म्ब्रोस (पॉडिचेरी),वंदना कुमारी (बिहार) यांची निवड झाली.

            क्रीडा मंत्रालयाच्या आदेशाने नोडल अधिकारी म्हणून संस्थापक डॉ. व्यंकटेश वांगवाड यांची नेमणूक करण्यात आली होती.कार्यकारिणी निवड संपल्यावर मागील कार्यकारिणीचे अध्यक्ष आनंद खरे व डॉ. रितेश वांगवाड यांनी नवीन निवडलेल्या पदाधिकार्‍यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच निवडणूक अधिकारी रमेश शेलार यांनीही नवीन पदाधिकार्‍यांचे अभिनंदन केले.

         डॉ. व्यंकटेश वांगवाड यांनी नवीन कार्यकारिणीला संबोधित करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. नवीन कार्यकारिणीने कार्यभार स्वीकारला. इतर सबसमित्यांवरील पदाधिकार्‍यांच्या नेमणुका केल्या. विकास समिती अध्यक्ष  सुरेश रेड्डी, डिसिप्लीन समिती धमेद्रसिंह जडेजा, महिला समिती, खेळाडू कल्याण समिती, तांत्रिक समिती, पंच समिती, कार्यक्रम समिती, प्रसिद्धी समिती आदी समित्यांवर पदाधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली. माजी सचिव डॉ. रितेश बांगवाड यांनी आभार मानले. निवडणूक प्रक्रिया कोणत्याही तक्रारीविना व शांततेत पार पाडल्या.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या