🌟परभणीत प्रेशित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर प्रश्नमंजुषा कार्यक्रम संपन्न....!


🌟यावेळी राज्यसभा सदस्य खासदार डॉ.फौजीया खान यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟


परभणी :- परभणी येथे दि मेमन मर्चंट असोसिएशन cee व FAME या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने नबी मोहम्मद पैगंबर सहाब यांच्या नावाने बी रघुनाथ सभागृह येथे दोन दिवसीय प्रश्नमंजुषा घेण्यात आली. सदरील स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम आज 23 फेब्रुवारी रविवार रोजी संपन्न झाले यावेळी मंचावर राज्यसभा सदस्य खासदार डॉ. फौजीया खान, तहसीन अहमद खान, पर्सनल लॉ बोर्ड चे सदस्य मौलाना रफीउद्दिन अश्रफी, दि मेमन मर्चंट असोसिएशनचे सचिव गुलाम मोहम्मद मिट्टू, सदस्य मुसा भाई, मोईदुल मुस्लिम हायस्कूल चे मुख्य अध्यापक मोहम्मद युसुफ, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद अब्दुल बासित, हाजी मोहम्मद पाडेला स्कूलचे मुख्याध्यापक मोहम्मद खालिद हाफिज, व दुसरे cee चे अधिकारी व सिरत चे संयोजक जलील अहमद, कार्यक्रमाचे संयोजक युसुफ अन्सारी, उपसंयोजक सरवर शरीफ, हे उपस्थित होते.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करताना डॉ. फौजिया खान यांनी सांगितले की, मुलांसाठी असे कार्यक्रम घेणे अत्यंत आवश्यक आहे तर बोला ना रफीउद्दिन साहेब यांनी सांगितले की मुलांना शिकवा व चांगले ज्ञान द्या असे ते बोलताना म्हणाले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शाळेच्या शिक्षकांनी व आयोजकांनी परिश्रम घेतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या