पुर्णा : पुर्णा शहरात नुकत्याच झालेल्या २२ व्या बौद्ध धम्म परिषदे साठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या परदेशातील सन्माननीय बौद्ध भिक्खुचा हृदयस्पर्शी सत्कार भारतीय संविधान गौरव समितीच्या वतीने मुख्य संयोजक जेष्ठ रिपाइं नेते तथा आंबेडकरी विचारवंत प्रकाशदादा कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व आखिल भारतीय भिक्खु संघाचे कार्याध्यक्ष पूज्य.भदंत उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
या प्रसंगी लेह लडाखचे भिख्खू संघसेना महाथेरो,तसेच दक्षिण कोरियाचे भिक्खु.थेर.ईम.चांग.वू.आणि भिखु.लि.ची.ऱ्यान यांना भारतीय संविधान ग्रंथाची प्रत,स्मृती चिन्ह,शाल आणि पुष्पगुच्छ देउन त्यांचा सत्कार करण्यात आला.या सत्कार प्रसंगी गौरव समितीचे मुख्य संयोजक प्रकाशदादा कांबळे,परभणी भुषण तथा माजी उपनगराध्यक्ष व गटनेते उत्तमभैया खंदारे,प्रा.अशोक कांबळे, कॉमरेड अशोक कांबळे,मुकुंद पाटील,गौतम काळे, शाहीर गौतम कांबळे आदिंची.प्रामुख्याने उपस्थिती होती.
या सत्काराच्या अनुसंगाने आपल्या भारत देशाचे संविधान दक्षिण कोरिया आणि लेह लडाख ला बौद्ध भिक्खुनच्या माध्यमाने पोहोंचल्याने गौरव समितीचे मुख्य संयोजक प्रकाश कांबळे यांनी समाधान व्यक्त करून बौद्ध भिक्खुनचे आभार व्यक्त केले.......
0 टिप्पण्या