🌟आता १०० कोटींहून अधिकच्या कामासाठी निविदा प्रक्रिया कालावधी २१ दिवसांचा असणार🌟
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीला नेत्यांनी एखाद्या मित्र कंत्राटदारासाठी शॉर्ट निविदा कशी काढली जाते ? असा प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारवर अनेकदा हल्लाबोल केला यासाठी राज्य सरकारने अखेर निविदा प्रक्रियेत पारदर्शकता यावी ई-निविदा प्रक्रियेचा कालावधी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे यापूर्वी १०० कोटी आणि त्यावरील कामासाठी ई-निविदा प्रक्रियेचा कालावधी ४५ दिवसांचा होता मात्र आता १०० कोटींहून अधिकच्या कामासाठी निविदा प्रक्रिया कालावधी २१ दिवसांचा असणार आहे.
याबाबत राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकताच शासन निर्णय जारी केला आहे गायमुख ते भाईंदर रस्त्यासाठी १४ हजार कोटींची निविदा फक्त २० दिवसांत मागवण्यात आली. इतक्या मोठ्या कामासाठी शॉर्ट टेंडर काढले कसे, असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ३ ऑक्टोबर २०२४ रोजी उपस्थित केला होता. निविदा प्रक्रियेचा कालावधी कमी करणे हे फक्त मित्र कंत्राटदारासाठी सुरू आहे अशी टीका मविआच्या नेत्यांनी केली होती. अखेर राज्य सरकारने ई- ब निविदा प्रक्रियेचा कालावधी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
शासन निर्णयान्वये ई-निविदा वि प्रसिद्धीबाबत देण्यात आलेल्या सूचना ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत लागू होत्या. आता संदर्भ क्र. १ मधील २७ सप्टेंबर २०१८ च्या शासन निर्णयामधील परिच्छेद क्रमांक २ मधील २.१ मध्ये ई-निविदा प्रसिद्धीच्या कालावधीत सुधारणा करण्यात आल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे....
0 टिप्पण्या