🌟सामाजिक कार्यकर्ता चिन्मय मिश्र यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली🌟
नवी दिल्ली : युनियन कार्बाईडचा विषारी कचरा पीठमपूरला जाळू नये याकरिता सामाजिक कार्यकर्ता चिन्मय मिश्र यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने आता युनियन कार्बाईडचा विषारी कचरा जाळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भोपाळहून हा कचरा पीठमपूरला आणला आहे. हा कचरा येथे जाळू नये, यासाठी सामाजिक कार्यकर्ता चिन्मय मिश्र यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
सुप्रीम कोर्टाने सांगितले की, याचिकाकर्ता हायकोर्टासमोर आपले म्हणणे मांडू शकते. तसेच हा कचरा जाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुरक्षिततेच्या नियमांचे पालन केले आहे, असे सरकारचे उत्तर आमच्याकडे आले आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने कचरा जाळण्यास परवानगी दिली.
0 टिप्पण्या