🌟श्री संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त आयोजित केला होता अखंड हरिनाम सप्ताह🌟
✍️ शिवशंकर निरगुडे
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील पानकनेरगांव येथील गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त श्री संत गजानन महाराज मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन आयोजन करण्यात आले होते.
१३ फेब्रुवारी पासून अखंड सप्ताहात सूरवात झाली असून या सोहळ्यात सात दिवस श्रीमद्भगवद्गीतेची कथा ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी हजेरी लावली होती या सप्ताहात ७ दिवस भजन, किर्तन, काकडा प्रवचन, पारायण ,काकडा, विजय ग्रंथ पारायण,भागवत कथा, हरिनाम, हरिकीर्तन ,हरिजागर, संगीत भागवत कथा व तसेच सांस्कृतिक धार्मिक असे अनेक कार्यक्रम संपन्न झाले व तसेच आठ दिवस व्यासपीठ चालक श्री ह भ प जय महाराज सरनाईक देऊळगाव बंडा यांच्या सह अनेक कीर्तनकाराच्या कीर्तनाची रेलचेल पहायला मिळाली यावेळी शेकडो भाविक भक्तांनी किर्तन ऐकण्याचा लाभ घेतला सात दिवसाच्या श्रीमदभगवतगितेमध्ये ९ व्या अध्याय मधे श्री कृष्ण गोपाल यांचा जन्म आणि १० व्या अध्याय मध्ये श्री भगवान कृष्ण आणी रूक्मिणी माता याचं शिवाजी आकलकर श्री कृष्णाचा आणी निकिता आकलकर या दोन्ही दाम्पत्यांनी रूक्मिणी मातेचा वेश परिधान करून साक्षात लग्न लावण्यात आले लग्न परंपरेनूसार यावेळी पाच मंगलाष्टके सूद्धा घेण्यात आली
त्यामुळे या कार्यक्रमाला शोशा आली व तसेच २० फेब्रुवारी रोजी श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीची गावातून टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली या सोहळ्याच्या मिरवणुकीत श्री हनुमान भजनी मंडळ, श्री जय गजानन भजनी मंडळ, श्री माणकेश्वर भजनी मंडळ, श्री कनकेश्वर महिला भजनी मंडळ, गजानन बाबा वारकरी मंडळ,तथा पानकनेर गावातील सर्व गावकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता व तसेच यावेळी सूनिल मगर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा वेश परिधान करून परिधान करून शोभा वाढवली व तसेच११ ते १ श्री ह भ प देवानंद महाराज शेळके ईसोलीकर काल्याचे किर्तन व नंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता करण्यात आली या अखंड हरिनाम सोहळ्याला हजेरी लावत हजारो भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला अखंड हरिनाम सप्ताहाचे नियोजन सर्व गावकरी मंडळींनी एकत्र करून केले होते.....
0 टिप्पण्या