🌟खंडीत विद्युत प्रवाहामुळे शेतकऱ्यांच्या पाण्याअभावी शेतातील उभ्या पिकांचे अतोनात नुकसान - शेतकरी माणिकराव सुर्यवंशी
पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील निळा फिडरवरील विद्यूत प्रवाह मागील २८ जानेवारी २०२५ पासून जवळपास पंधरा दिवसांपासून खंडीत असल्याने या परिसरातील पाण्याच्या विद्युत मोटारी बंद पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे पाण्याअभावी अतोनात नुकसान होत असून यास सर्वस्वी महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी जवाबदार असल्याने महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांनी निळा फिडर वरील विद्युत पुरवठा तात्काळ सुरळीत करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी माणिकराव सुर्यवंशी यांनी आज सोमवार दि.१० फेब्रुवारी २०२५ रोजी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
पुर्णा तालुक्यातील निळा येथील शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते माणिकराव सुर्यवंशी यांनी उपकार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की निळा फिडर वरील विद्युत प्रवाह मागील पंधरा दिवसांपासून सातत्याने खंडीत असल्याने शेतातील पाण्याच्या विद्युत मोटारी तसेच बोर मधील मोटारी देखील बंद असल्याने परिसरातील असंख्य शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिकं गहू,हरबरा,कांदा,ऊस,हळद,केळी,ज्वारी,मिरची आदींसह पालेभाज्या फळबागायतींचे पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून यास सर्वस्वी महावितरण कंपनीचा बेजवाबदार व गलथान कारभार जवाबदार असल्याने में.उपकार्यकारी अभियंता साहेब यांनी तात्काळ याकडे लक्ष देऊन निळा फिडर वरील विद्युत प्रवाह सुरळीत करावा नसता नाईलाजास्तव आम्ही निळा येथील शेतकरी महावितरण कंपनीच्या बेजबाबदार कारभारा विरोधात शुक्रवार दि.१५ फेब्रुवारी २०२५ रोजी आपल्या कार्यालयासमोर उपोषण करु उपोषणा दरम्यान जर उपोषणकर्त्याच्या जीवाचे काही कमी-जास्त झाले तर याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण कंपनीची राहील कृपया याची नोंद असेही निवेदनात म्हटले आहे.....
0 टिप्पण्या