🌟तर हिंगोली जिल्हा सचिवपदी आनंद चंद्रशेखर निलावार व कोषाध्यक्ष पदी ॲड.अशोक डूब्बेवार यांची निवड🌟
हिंगोली(०७ फेब्रुवारी २०२५) :- हिंगोली जिल्हा आर्य वैश्य समाज जिल्हा शाखेच्या जिल्हाध्यक्ष पदी हिंगोली येथील गिरीश विजयकुमार गुंडेवार,सचिवपदी आनंद चंद्रशेखर निलावार तर कोषाध्यक्ष पदी ऍड अशोक डूब्बेवार सह नूतन कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली.
हिंगोली येथील आर्य वैश्य समाज भवनात ६फेब्रुवारी रोजी आर्य वैश्य महासभा हिंगोली जिल्हा शाखेच्या सदस्यां समवेत महासभा समन्वयक सर्वश्री प्रदीप कोकडवार,प्रा.अनिल मुगट कर,ज्ञानेश्वर मामडे,ज्येष्ठ पत्रकार डॉ.विजय निलावार ,मावळते अध्यक्ष सचिन गुंडेवार,आदी उपस्थित होते.प्रा मुगटकर ह्यांनी सदरील सभा ही नूतन कार्यकारिणी निवडी साठी असून मागील कार्यकारिणी र चा कार्य काळ संपुष्टात आल्याने आयोजित आहे असे सांगून महासभा कार्या बद्दल माहिती दिली. नूतन कार्यकारिणीची निवड करावी त्या साठी सूचक अनुमोदक ह्यांनी नाव सुचवावे आणि सर्वांनी निवड मान्य असल्याचे जाहीर सांगावे अस प्रदीप कोकडवार ह्यांनी आवाहन केलं.
त्यानुसार अध्यक्ष पदासाठी गिरीश गुंडेवार,सचिव पदासाठी आनंद निलावार,कोषाध्यक्ष पदासाठी विधीज्ञ अशोक डूब्बेवार ह्यांच्या पदासाठी सूचक व अनुमोदक म्हणून अनुक्रमे सर्वश्री सचिन गुंडेवार, आशिष पिंगळकर,गिरीश गुंडेवार,संतोष प्रतापवार,महेश गोविंदवार, ह्यांनी जाहीर केले.महाभेच्या इतिहासात प्रथमच जिल्हा कार्याध्यक्षपदी बाळापूर येथील समाजसेवक महेश गोविंदवार ह्यांची सर्वानुमते निवड झाल्यानंतर नूतन पदाधिकारी आणि सदस्यांना मंचावर विराजमान करण्यात आले.मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकारी आणि सदस्याचां सत्कार करण्यात आला.उर्वरित कार्यकारिणी निर्मिती चे अधिकार नूतन अध्यक्ष,सचिव व कोषाध्यक्ष ह्यांना सर्वानुमते देण्यात आले.ज्येष्ठ पत्रकार डॉ.विजय निलावार, ह्यांनी बिनविरोध निवडणूक प्रक्रिया संपन्न केल्या बद्दल सहभागी झालेल्या सर्व समाज बांधवांचे मंचावरील समन्वयक , मान्यवर आणि नूतन कार्यकारिणी चे अभिनंदन केले.समारोपीय भाषणात समन्वयक प्रदीप कोकडवार ह्यांनी सर्वांनी एकदिलाने काम करावं असं आवाहन केलं व आर्यवैश्य महासभा नांदेड द्वारे माजी मंत्री आ.सुधीर भाऊ मुनगंटीवार ह्यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रमात दि.११ फेब्रुवारी मंगळवारी वासवी भवन नांदेड येथे सायंकाळी ५ वाजता सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.नूतन कार्यकारिणीत समाविष्ट सर्वांचा सत्कार मंचावरिल मान्यवरानी केला व प्राप्त कार्यकाळात आर्य वैश्य समाजाच्या सर्व धार्मिक सामाजिक आणि राष्ट्रीय उपक्रम राबवावेत अस आवाहन केलं.गिरीश गुंडेवार ह्यांनी आपल्या नूतन टीम च्या माध्यमातून ऐतिहासिक नोंदी सह कामगिरी बजावणार असा संकल्प जाहीर करून नूतन टीम ने आपला अमूल्य वेळ समाज कार्यासाठी द्यावा अस आवाहन केलं.संचालन आशिष पिंगळकर,तर आभार आनंद निलावार ह्यांनी मानले.संपूर्ण कार्यकारिणी लवकरच आम्ही जाहीर करू अस जिल्हाध्यक्ष गिरीश गुंडेवार ह्यांनी सांगितले...,.
0 टिप्पण्या