🌟गंगाखेड तालुक्यातील मौजे राणीसावरगाव येथे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न......!


🌟आपल्याला आपला गंगाखेड मतदारसंघ परिपूर्ण आणि विकासभिमुख करायचा आहे - आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे 


गंगाखेड :- गंगाखेड तालुक्यातील मौजे राणीसावरगाव येथील बसस्टँड परिसरात काल रविवार दि.१६ फेब्रुवारी २०२५ रोजी गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी सत्कार सोहळ्यात उपस्थित राहून सर्वांशी अगदी मनमोकळा संवाद साधला तसेच आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी निवडणूक काळातील काही आठवणी सांगून यंदाच्या विजयात सर्वांचे मोठे योगदान असल्याचे आवर्जून नमूद केले. शिवाय भविष्यात आपल्या सर्वांना मिळून विकासाचे राजकारण यशस्वी करायचे आहे अशीही भूमिका त्यांनी मांडली यावेळी त्यांनी उपस्थितांना आपल्या समस्या,अडचणी आणि मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. 


यावेळी बोलतांना आमदार डॉ रत्नाकर गुट्टे म्हणाले की आपल्याला आपला मतदारसंघ परिपूर्ण आणि विकासभिमुख करायचा आहे. त्यासाठी आपला पाठिंबा, आशीर्वाद आणि स्नेह कायम ठेवा, असेही आवाहन उपस्थित जनसमुदायास त्यांनी केले याप्रसंगी आपण मला प्रेमाने शुभेच्छा व सदिच्छा देण्यासाठी आपण केलेली प्रचंड गर्दी पाहून फार समाधान वाटले तसेच आज पर्यतच्या माझ्या कामाची हीच खरी पोहोचपावती असल्याची माझी भावना असल्याचे देखील यावेळी ते म्हणाले गंगाखेड हा माझ्यासाठी केवळ विधानसभा मतदारसंघ नसून माझा परिवार आहे याची आज मला पुन्हा एकदा प्रचिती आली असेही यावेळी आमदार डॉ रत्नाकर गुट्टे म्हणाले.

यावेळी कार्यक्रमाचे औचित्य साधून आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी विविध विकास कामाचे भूमिपूजन देखील केले यावेळी आमदार डॉ गुट्टे यांनी मित्र मंडळाच्या ओबीसी जिल्हाध्यक्षपदी सुरेश चव्हाण, गंगाखेड तालुका प्रभारी पदी बालासाहेब लटपटे व तालुका उपाध्यक्षपदी भास्कर ठावरे यांची सर्वानुमते निवड केली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा मित्रमंडळाचे विधानसभा अध्यक्ष किशनराव भोसले, मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष संदीप आळनुरे, उपसभापती संभाजी पोले, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहनराव गळाकाटु, मित्रमंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णाजी सोळंके, युवक जिल्हाध्यक्ष संदीप वाळके, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष इकबाल चाऊस, माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण मुंडे, प्रभारी बालाजी लटपटे तालुकाध्यक्ष प्रल्हाद शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कृष्णा दळणर, हनुमंत मुंडे, अल्ताफ शेख, युवक तालुकाध्यक्ष कुलदीप जाधव, राहुल बानाटे, माजी सभापती मुंजाराम मुंडे, माजी सरपंच सुरेश चव्हाण, सोमनाथ कुदमुळे, शेषराव सलगर, गोविंद सानप, गोविंद डोणे, आकाश राठोड, पवन सोन्नर, भास्कर ठवरे यांच्यासह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या