🌟माझ्या आयुष्यातील ऐतिहासिक व सोनेरी क्षण - आमदार डॉ रत्नाकर गुट्टे
गंगाखेड :- गंगाखेड शहरात लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे काल रविवार दि.१६ फेब्रुवारी २०२५ रोजी मोठ्या दिमाखात आगमन झाले. याप्रसंगी आवर्जून उपस्थित असलेले गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुबक व दिमाखदार पुतळ्याचे स्वागत करीत 'जानता राजा' मानाचा मुजरा करून मनोभावे दर्शन घेतले यावेळी बोलतांना आमदार डॉ रत्नाकर गुट्टे म्हणाले की या ऐतिहासिक आनंदोत्सवात सहभागी झालो हा माझ्या आयुष्यातील सोनेरी क्षण आहे त्यामुळे तो कायम स्मरणात राहील.
गंगाखेड शहरात गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्यासाठी मोहीम सुरू होती अखेर त्या मोहीमेस व असंख्य शिवप्रेमींच्या प्रयत्नांना यश आले असून लवकरच हा पुतळा विराजमान होत असल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे देखील आमदार गुट्टे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याच्या स्थापनेतून तालुक्यासह जिल्ह्यातील नागरिक, युवक आणि युवतींना प्रेरणा मिळेल पाच-पाच जुलमी सत्तांच्या विरूद्ध लढा पुकारून सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी स्वराज्य स्थापन करणारे अखंड हिंदुस्तानचे प्रेरणास्थान स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा म्हणजे पराक्रम, जिद्द, त्याग आणि इतिहासाची सदैव आठवण देत राहील यात शंका नाही असेही यावेळी आमदार डॉ रत्नाकर गुट्टे म्हणाले.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष व मित्र मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, स्मारक समितीचे पदाधिकारी तसेच पंचक्रोशीतील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.....
0 टिप्पण्या