🌟उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील कुंभमेळा चेंगराचेंगरी प्रकरणी सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार...!

 


🌟या याचिकेवरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने काल सोमवार दि.०३ फेब्रुवारी रोजी स्पष्ट नकार दिला🌟

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर महाकुंभमेळ्यात उपस्थित राहणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेची हमी देण्यासाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती मात्र या याचिकेवरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने काल सोमवार दि.०३ फेब्रुवारी २०२५ रोजी स्पष्ट नकार दिला.

उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये १३ जानेवारीपासून महाकुंभ मेळा सुरू आहे. या महाकुंभ मेळ्यासाठी आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी हजेरी लावली आहे. मात्र, या कुंभमेळ्यात 'मौनी अमावास्ये'च्या दिवशी संगमावर प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे चेंगराचेंगरीची दुर्घटना होऊन ३० भाविकांचा मृत्यू झाला होता. तसेच या घटनेत ६० जण जखमी झाले होते. प्रयागराजमधील त्रिवेणी संगमाजवळ 'मौनी अमावास्ये'च्या दिवशी रात्री १ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यानंतर जखमी झालेल्या भाविकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यामधील काही भाविकांवर अद्यापही उपचार सुरू.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या