🌟महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या......!


🌟पुण्यात आई-वडिलांच्या किरकोळ वादात मुलांचा बळी : जन्मदातीनेच गळा दाबून दोन मुलांना संपवलं, नवऱ्यावरही कोयत्याने वार केले🌟

💫वडिलांच्या आठवणीने वैभवी देशमुखची आर्त हाक, धनंजय देशमुखांचा न्यायासाठी संघर्ष, संतोष देशमुख प्रकरणाचा 60 दिवसांचा स्पेशल रिपोर्ट ; दोन महिने संयम बाळगला,आता माझाही बांध फुटलाय,आता तरी कृष्णा आंधळेला अटक होणार का ? धनंजय देशमुखांचा पोलिसांवर प्रश्नांचा भडीमार 

💫 संतोष देशमुखांचा मारेकरी कृष्णा आंधळेला धनंजय मुंडेंनी लपवून ठेवलंय; मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप ; महादेव मुंडे प्रकरणाचा तपास तात्काळ SIT किंवा CID द्या अन्यथा आमरण उपोषण करणार, पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचा प्रशासनाला इशारा 

💫 मनोज जरांगेंचे मेहुणे विलास खेडकरसह 9 जणांवर वाळू तस्करीप्रकरणी तडीपारीची कारवाई, जालन्यात प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर ; माझं तोंड बंद करण्यासाठी त्यांनी षडयंत्र रचले,  मेहुण्याला तडीपारीची नोटीस मिळताच मनोज जरांगेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका ; कोणाचा साला आहे कोणाचा नातेवाईक आहे याच्यावर कारवाई होत नसते गुन्हे केले असतील तर कारवाई होणारच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिउत्तर 

💫 ठाकरे गटाचे राजन साळवी 13 फेब्रुवारीला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा, पण मंत्री  उदय सामंत व आमदार किरण सामंत या सामंत बंधुंचा विरोध कायम

💫आई-वडिलांच्या किरकोळ वादात मुलांचा बळी, जन्मदातीनेच गळा दाबून दोन मुलांना संपवलं, नवऱ्यावरही कोयत्याने वार केले, पुण्यातील धक्कादायक घटना 

💫 मुलीच्या निर्घृण हत्येनंतर डिप्रेशनमध्ये, शेवटची इच्छाही अधुरीच राहिली; श्रद्धा वालकरच्या वडिलांनी घेतला अखेरचा श्वास ; आरोपीने लेकीचे 35 तुकडे केले, बाप शेवटपर्यंत लढत राहिला ; श्रद्धा वालकरच्या वडिलांचा अचानक मृत्यू

💫छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात 31 नक्षलींचा खात्मा, दोन जवान शहीद तर दोन जखमी ; गेल्या नऊ महिन्यात तब्बल 183 नक्षलींचा खात्मा; छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेवर नक्षलींचा बिमोड सुरुच 

💫पाकिस्तानच्या गुप्तचर खात्यासाठी हेरगिरी करणाऱ्या संदीप सिंहला अटक, नाशिक येथील आर्मी कॅन्टोन्मेंटमध्ये होता कार्यरत 

 💫माघी गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील मंडळानी बसवलेल्या पीओपी गणेश मूर्तींच्या विसर्जनाला पालिकेची मनाई, हायकोर्टाच्या आदेशावर बोट, मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची मंडळ आणि मूर्तीकारांची मागणी 

💫 इंग्लंडविरोधातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासमोर 305 धावांचं आव्हान, रवींद्र जडेजाने पटकावले तीन बळी ; पाकिस्तानच्या मैदानातील सदोष लायटिंगमुळं नजर हटली, न्यूझीलंडचा खेळाडू रचिन रवींद्र रक्तबंबाळ, गमावला असता डोळा  

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या