🌟शहरातील शहिदपुरा भागात सुडनाट्यातून गोळीबार करण्यात आल्याची जोरदार चर्चा🌟
नांदेड :- नांदेड शहरातील शहीदपुरा भागात आज सोमवार दि.१० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ०९.०० ते ०९.३० वाजेच्या सुमारास हत्या प्रकरणात सजा झालेल्या व पॅरोलवर सुटलेल्या गुन्हेगारासह त्याच्या मित्रावर दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात हल्लेखोरानी गोळीबार केल्याची घटना घडली या गोळीबाराच्या घटनेत जखमी झालेल्या दोघांनाही उपचारासाठी शहरातील विष्णुपुरी येथील डॉ शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयालात दाखल करण्यात आले असता उपाचारा दरम्यान यातील एकाचा मृत्यू झाल्याचे समजते.
या घटने संदर्भात अधिक माहिती अशी आज सोमवार दि.१० फेब्रुवारी रोजी सकाळी ०९.०० ते ०९.३० वाजेच्या दरम्यान सचखंड गुरुद्वारा गेट क्रमांक सहा परिसरातील शहीदपुरा भागात अचानक गोळीबार झाला यावेळी हत्येच्या गंभीर गुन्ह्यातील सजा झालेला गुन्हेगार गुरमितसिंघ सेवादार आणि त्याचा मित्र रविंद्रसिंघ राठोड शहीदपुरा भागात आले असताना मोटारसायकलवर आलेल्या एका अज्ञात आरोपीने दोघांवर बेछुट गोळीबार केला अज्ञात आरोपीने जवळपास आठ ते दहा गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे एक गोळी त्याठिकाणी उभ्या असलेल्या एका गाडीच्या काचेवार लागून दुसऱ्या बाजूने दरवाजा चिरत निघाली दोन्ही जखमीना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचार सुरु असताना रवींद्रसिंग राठोड याचा मृत्यू झाला पॅरोलवर असलेला गुन्हेगार गुरमितसिंग सेवादार याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान एक संशयित हल्लेखोर गोळीबार करून एका दुचाकीवरून भरधाव वेगात पळून जाताना सिसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असल्याचे समजते नांदेड पोलीस त्या हल्लेखोराचा शोध घेत आहेत या घटनेत जखमी असलेला गुरुमितसिंघ सेवादार सन २०१६ मध्ये झालेल्या स.सत्येद्रसिंघ संधू यांच्या हत्येतील शिक्षा झालेला गुन्हेगार असल्याने त्यांच्यावर झालेला हा गोळीबार सुडनाट्यातूनच झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.....
0 टिप्पण्या