🌟असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गिता गुट्टे यांनी केले🌟
परभणी : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील लाभार्थ्यांनी रमाई आवास घरकुल योजनेसाठी अर्ज करावेत असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गिता गुट्टे यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील लोकांचे राहणीमान उंचावणे व त्यांच्या निवार्याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागामध्ये त्यांच्या स्वतःच्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्के घर बांधून देण्यासाठी रमाई घरकुल आवास योजना (ग्रामीण व शहरी) राबविण्यात येत आहे. या योजनेकरीता लाभार्थ्यांना 7/12 चा उतारा, मालमत्ता नोंदपत्र (प्रॉपर्टी रजिीस्टर्ड कार्ड) ग्रामपंचायतीतील मालमत्ता नोंदवहीतील उतारा यापैकी एक, घरपट्टी, पाणीपटी, विद्युत बिल या कागदपत्रापैकी एक, सक्षम प्राधिकार्याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकीत प्रत, सक्षम प्राधिकार्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला या आवश्यक कागदपत्रांसह अतिरिक्त दाखले म्हणून 1-1-1995 च्या किंवा मतदार यादीतील नावाचा उतारा, निवडणुक मतदार ओळखपत्र, रेशनकार्ड, सरपंच/तलाठ्याचा दाखला आदी कागदपत्रे आवश्यक असणार आहेत. इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी आपल्या तालुक्याचे गट विकास अधिकारी, पंचायत समिती या कार्यालयाकडे आवश्यक कागदपत्रासह परिपुर्ण अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गिता गुट्टे यांनी केले आहे.
दरम्यान, सन 2024-25 या वर्षाकरीता परभणी जिल्हयाकरीता एकूण 3908 घरकुलाचे उदिष्ट आहे. त्यामध्ये गट विकास अधिकारी, पंचायत समिती परभणी- 500, मानवत-300, गंगाखेड-350, सोनपेठ-350, सेलू-550, जिंतूर -950, पुर्णा -270, पाथरी -258 व पालम-380 इतके उद्दिष्ट आहे......
0 टिप्पण्या