🌟महाशिवरात्रीनिमित्त महादेवाच्या पालखीची मिरवणूक महाशिवरात्री निमित्त वेशभूषा करून साक्षात अवतरले देव देवता🌟
✍️ शिवशंकर निरगूडे (हिंगोली)
हिंगोली :- हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील जागृत असलेल्या श्री माणकेश्वर बाबा यांचे मंदिर आहे माणकेश्वर बाबा हे मंदिर प्राचीन काळापासून असलेलं भाविकांचे जागृत श्रद्धस्थान आहे येथील शेकडो भावी दूरवरून दर्शन घेण्यासाठी येत असतात महाशिवरात्रीच्या महोत्सव निमित्त भाविकांची गर्दी पाहायला मिळते त्याच निमित्ताने २६फेब्रुवारी रोजी पानकनेरगांव पंचक्रोशीतील व गावातील हजारो भावी भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला.
भगवान शंकराच्या भक्तासाठी शिवरात्र खूप महत्त्वाचे असते त्यादिवशी भाविक भक्त भगवान शंकराची मनोभावी पूजा करत असतात व तसेच शिवलिंगावर अभिषेक करून शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण त्यांच्या आवडीचे पदार्थ फुल अर्पण करत असतात तसेच भाविक भक्त निरंकार उपवास करतात महाशिवरात्रीचे औचित्य साधून मध्यरात्रीच्या बारा वाजल्यापासून भाविक भक्तांकडून श्री माणकेश्वर बाबा मूर्तीचे दर्शन घेत रूद्राभिषेक करण्यासाठी गर्दी पाहायला मिळते व तसेच महाशिवरात्रीचा महोत्सव सोहळा पाहण्यासाठी गावातील सर्व लोकांचे नातेवाईक लांबवरून येत असतात.
महाशिवरात्रीचे औचित्य साधून रात्री आठच्या सुमारास गावचे ग्रामदैवत असलेल्या माणकेश्वर बाबाची पालखी, श्री करण सिद्ध बाबाची, कनकेश्वर महाराज, श्री आप्पा स्वामी महाराज, श्री संत गजानन महाराजांची पालखीसह अशा अनेक देवाच्या पालखीचे गावांमध्ये भव्य दिव्य मिरवणूक काढले जाते व तसेच पालखी मधील भक्तगणांना जागोजागी चहापाणी फराळ त्याचे वाटप केले जाते सदर हा महोत्सव पाहण्यासाठी गावातील भाविक भक्तांची प्रचंड गर्दी उसळते तसेच यावेळी भक्तगणांनी साधुसंत देव देवतांचे वेशभूषा परिधान करून महोत्सवाचा उत्सव व आनंद पहायला मिळाला या वेशभूषा मध्ये साक्षात नगरीमध्ये देव देवी देवता काही वेळ अवतरल्यासारखे वाटत होते देवांची वेशभूषा परिधान करणारे कलाकार शंकराचे रूपितशिवाजी शिंदे, पार्वतीच्या प्रल्हाद खेडेकर, गणपती उज्वल आरे, रामाच्या रूपात आकाश देवकर, लक्ष्मण चारूपातप्रवीण क्षिरसागर,
💫सिताच्या रूपात सुमित जाधव :-
नंदी सुभाष मस्के,बजरंगच्या रूपात शंकर देशमुख अभिषेक देशमुख, ऋषिकेश देशमुख, जय आकले, गणेश देशमुख, कार्तिक भुते, अभिषेक महाजन, मयूर महाजन, नवनाथ शिंदे ,अभिषेक बांगर,कल्याण देशमुख, अमोल देशमुख, अनिल देशमुख,दशरथ शिंदे,अनिल नाईक, राजू निंबलवार गोपा शंनकुडे,पदमाकर अविनाश आकमार, अनेक भक्तगणांनी देव दैवतांचा वेश परिधान करून शोभा वाढवली होती विशेष म्हणजे बालचिमुकला यांनी महादेवाचा वेश परिधान करून सर्व भाविकांचे मन आकर्षित केले होते या भक्तगणांच्या वेशभूषांमुळे काही वेळ नगरीत देव, देवता अवतरल्या सारखे वाटत होते व तसेच सकाळी तीनच्या सुमारास पालखी सोहळा संपन्न दरम्यान पालखीतील तेल मंडळ गल्लीत भारुड कार्यक्रम घेतला जातो सकाळी ८ च्या दरम्यान जागृत असलेले देवस्थान मानकेश्वर बाबा येथे महाप्रसाद आयोजन केले जाते भावी भक्त महाप्रसादाचा लाभ घेऊन आपापल्या गावी परतात या सर्व महोत्सव सोहळ्याचे येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन श्रीमती मंगलताई उमाकांत आप्पाहेंद्रे यांनी केले होते......
0 टिप्पण्या