✈️ दिल्ली-प्रयागराज विमान भाडे ३० हजार रुपये✈️
प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभचा आज बुधवार दि.२६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला शेवटचा दिवस असल्यामुळे प्रयागराजच्या संगमावर पवित्र स्नान करायला काल मंगळवार दि.२५ फेब्रुवारी २०२५ रोजी पुन्हा एकदा भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली मागील महिन्यात १३ जानेवारीला कुंभमेळा सुरू झाल्यापासून गेल्या ४४ दिवसांत ६४.३३ कोटी भाविकांनी पवित्र स्नान केले आहे काल मंगळवारी सायंकाळी ०४.०० वाजेपर्यंत ९७.२१ लाख जणांनी स्नान केले १४४ वर्षांनंतर आलेल्या महाकुंभमेळ्यात स्नान करायला भाविक प्रयागराजला जात आहेत. २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला स्नान करायला भक्तांची मोठी गर्दी जमणार आहे. त्यामुळे शहरात वाहतूककोंडी झाली आहे.
महाशिवरात्रीनिमित्त शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. मंगळवारी सायंकाळी ४ वाजल्यापासून कुंभमेळा क्षेत्रात प्रशासनाच्या गाड्या सोडून सर्व वाहनांना बंदी घातली आहे. मंगळवारी सायंकाळी ६ वाजल्यानंतर प्रयागराज संगमापासून १० ते १२ किमीपर्यंत भाविकांना रोखले जाणार आहे. भाविकांनी जवळच्या घाटावर स्नान करावे किंवा घरी जावे. तसेच महाकुंभमध्ये गस्त घालण्यासाठी हवाई दलाचे जवान तैनात केले आहेत.
✈️ दिल्ली-प्रयागराज विमान भाडे ३० हजार रुपये :-
महाशिवरात्रीनिमित्त शेवटचे स्नान करायला भाविकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे दिल्ली ते प्रयागराज विमान भाडे ३० हजार, तर मुंबई-प्रयागराज भाडे २५ हजार रुपयांवर पोहोचले आहे.....
0 टिप्पण्या