🌟भारत देशासह चार देशांना शुक्रवारी जाणवले भूकंपाचे धक्के : हा भूकंप ५.५ रिश्टर स्केलचा होता.....!


🌟बिहारच्या पाटणा येथे भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घराबाहेर🌟

नवी दिल्ली : भारत देशासह नेपाळ,तिबेट आणि पाकिस्तान या चार देशांना काल शुक्रवार दि.२८ फेब्रुवारी २०२५ रोजी भूकंपाचे धक्के बसले.

भारतातील बिहार राज्यातल्या पाटणा येथे भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक भितीपोटी घराबाहेर धावले या भूकंपाची तीव्रता ५.५ रिश्टर स्केल एवढी होती तर नेपाळच्या बागमती भागातही भूकंपाचे धक्के जाणवले या भूकंपामुळे कुठली जीवित अथवा वित्तहानी झाली नाही तिबेटमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. पाकिस्तानात सकाळी ०५.०० वाजून १४ मिनिटांना भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. धक्के जाणवताच लोक लगेच घराबाहेर पळाले हा भूकंप ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या