🌟प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हाधिकारी यांच्या कडे मागणी🌟
परभणी - मानव विकास योजने अंतर्गत सायकल वाटप योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला याची चौकशी करणे बाबत प्रहार जनशक्ती पक्षाच्या तक्रारीनुसार तत्कालीन मा. जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या चौकशी समिती अहवालानुसार मानव विकास योजने अंतर्गत वाटप करण्यात आलेल्या एकुण निधीपैकी ५० लक्ष १ हजार ३७२ रुपये इतक्या रक्कमेचा हिशोब जुळत नाही व या बाबत लेखे संचित करण्यात आलेले नाहीत ही गंभीर बाब आहे असे स्पष्ट निरिक्षण नोंदविले होते. यावर जिल्हाधिकारी यांनी दि. ११ जून २०२४ रोजीच्या पत्रान्वये मा. शिक्षणाधिकारी (मा.) यांची सुनावणी घेतली होती. या सुनावणी अंतर्गत मा. शिक्षणाधिकारी (मा.) जिल्हा परिषद परभणी यांचे पत्र दि. ३० जुलै २०२४ व २५ ऑक्टोंबर २०२४ नुसार मानव विकास योजनेअंतर्गत सायकल वाटपासाठी मिळालेल्या एकुण निधी पैकी ५० लक्ष १ हजार ३७२ रुपये इतका निधी के.जी.बी.व्ही. मानव विकास योजनेच्या निर्वाह भत्ता व शिक्षक मानधन म्हणून अग्रीम खर्च केला आहे व या बाबत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची मंजुर टिप्पणी सह हा निधी वर्ग केला.
मुळात सायकल वाटप करण्यासाठी देण्यात आलेला निधी निर्वाह भत्ता व शिक्षक मानधना करीता वळविणे पुर्णपणे बेकायदेशीर व नियमबाह्य आहे व मानव विकास सायकल वाटप संदर्भात दि. १६ फेब्रुवारी २०२२ च्या शासन निर्णय व आपल्या कार्यालयाचे प्रशासकीय मंजुरी दि. १८ ऑगस्ट २०२२ व दि. २८ डिसेंबर २०२२ तसेच निधी वितरण आदेश दि. २२ ऑगस्ट २०२२ चे उल्लंघन करणारे आहे. शिवाय जो निधी वळविण्यात आला त्यामुळे या योजनेतील १ हजार विद्यार्थीनी सायकली पासुन वंचित राहिल्या ही अत्यंत गंभीर बाब आहे. यामुळे संबंधीत प्रकरणात मानव विकास योजना परभणी जिल्हा अध्यक्ष या नात्याने आपण संबंधीत तत्कालीन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या या सायकल वाटपाचा निधी इतर बाबीवर खर्च करण्यासंदर्भात देण्यात आलेल्या परवानगीची तात्काळ चौकशी करुन कारवाई करावी या मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी परभणी यांना देण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या वतीने निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी स्वीकारले.
निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, उपजिल्हाप्रमुख रामेश्वर जाधव, तालुका प्रमुख उद्धव गरुड, शहर चिटणीस वैभव संघई, शेख बशीर, बाळासाहेब नरवाडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत......
0 टिप्पण्या