🌟लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मांडताच विरोधकांनी घातला धुमाकूळ : दुपारनंतर कामकाज स्थगित....!


🌟संसद भवनाबाहेर विरोधीपक्ष नेते राहुल गांधी व खासदार प्रियांका गांधींचे आंदोलन🌟

नवी दिल्ली : लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने आज गुरुवार दि.१३ फेब्रुवारी रोजी वक्फ बोर्ड सुधारणा सुधारणा विधेयक मांडताच विरोधीपक्षांनी आकांडतांडव करीत तुफान राडा केला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज हे सुरुवातीला १५ मिनिटांसाठी स्थगित आणि त्यानंतर दुपारी ०२.०० वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले या विधेयकावरचा अहवाल राज्यसभेत सादर केला तेव्हा विरोधी पक्षांनी जोरदार घोषणाबाजी करुन गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

लोकसभेचे कामकाज तहकूब केल्यानंतर प्रियांका गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस खासदारांनी जोरदार आंदोलन केले. वक्फ सुधारणा विधेयक आणून भाजपाला तिरस्कार पसरवायचा आहे असा आरोप विरोधी खासदारांनी केला. वक्फ सुधारणा विधेयकावर संसदीय समितीचा अहवाल राज्यसभेत सादर झाला, तेव्हाही गदारोळ झाला. या सुधारणा विधेयकात अनेक कमतरता आणि त्रुटी आहेत, असा आरोप काँग्रेसचे खा. गोगोई यांनी केला. तसेच सरकारने त्यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे असेही ते म्हणाले. राज्यसभेत वक्फवरुन प्रचंड गदारोळ झाल्यानंतही या संदर्भातला अहवाल भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी मांडला. या दरम्यान विरोधी पक्षांनी घोषणाबाजी करत गदारोळ केला. सभापती जगदीप धनकड यांनी गदारोळानंतर राज्यसभेचे कामकाज १५ मिनिटांसाठी स्थगित केले होते. राज्यसभेप्रमाणे लोकसभेतही राडा झाला. त्यानंतर हे विधेयक मागे घेण्याचीही मागणी करण्यात आली. लोकसभेत विरोधकांचा गदारोळ इतका वाढला की, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज दुपारी दोन पर्यंत स्थगित केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या