🌟तांत्रिक मदतीच्या आधारे रॉयल उर्फ रॉय एडवर्ड सिकेरा या घटनेतील मास्टरमाईंड असल्याचे उघड🌟
मुंबई :- : मुंबई येथील वसई पश्चिमेतील येथील मयंक ज्वेलर्स या दुकानात दोन आठवड्यांपूर्वी १० जानेवारी २०२५ रोजी दोन मोटारसायकलस्वार शसस्त्र दरोडेखोरांनी पिस्तूल व शस्त्राचा धाक दाखवून तब्बल ८० लाख रुपयांच्या किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची लूट केली होती सदरील दरोडेखोरांनी पिस्तूलचा धाक दाखवत शस्त्राच्या मुठीने मयंक ज्वेलरी शॉपच्या मालकाला जखमी करून सोने लुटले होते. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आणि एकाला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर इतर चार आरोपींना मुंबई,महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी २३ लाख रुपये किमतीचे सोने,एक ऑटोमॅटिक पिस्तूल,कोयता,कटोनी,दोन मोबाईल,मॅगझिन,एक जिवंत कारतूस इत्यादी हस्तगत केले.
१० जानेवारीच्या सुमारास दोन मोटारसायकलस्वार दरोडेखोर तरुण वसई पश्चिम येथील मयंक ज्वेलर्सच्या दुकानात घुसले. त्यानंतर त्यांनी दुकानमालक रतनलाल छगनलाल संघवी यांच्यावर पिस्तूलने हल्ला करून ८० लाख रुपये किमतीचे सोने लुटले आणि पळून गेले. त्यानंतर जखमी दुकानदाराने लूट झाल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून काही संशयास्पद व्यक्तींची ओळख पटली
तांत्रिक मदतीच्या आधारे रॉयल उर्फ रॉय एडवर्ड सिकेरा हा मास्टरमाईंड असल्याचे समजले. त्याला सापळा रचून वसई पश्चिमच्या टोकपाडा भागातून ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली. चौकशीत त्याने मयंक ज्वेलर्स शॉपमध्ये लूट करण्याची कबूल केली. त्याच्या दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी अनुज गंगाराम चौगुले (३६), रॉयल उर्फ रॉय एडवर्ड सिकेरा (४६), लाल सिंह उर्फ सीताराम सरजेराव (५६), सौरभ उर्फ फ पप्पू तुकाराम राक्षे (२७) या आरोपींना तर चोरीचे दागिने विकत घेणारा अमर भारत निमगिरे (२१) याला ताब्यात घेतले आहे.......
0 टिप्पण्या