🌟उत्तर प्रदेश राज्यातील झांसी येथे आयोजित ऑनलाईन कला स्पर्धेत मिळवला महाजन यांनी सिल्वर अवॉर्ड🌟
परभणी :- उत्तर प्रदेश राज्यातील झांसी येथील मनकर्णीका आर्ट गॅलरी तर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील ऑनलाईन कला स्पर्धेत परभणी जिल्ह्यातील ज्योतीर्मय इंग्लिश स्कूलच्या आदर्श कला शिक्षिका सौ तृप्तजा कुलभूषण महाजण (दलाल) यांनी राष्ट्रीय स्तरावरील सिल्वर अवॉर्ड मिळवून परभणी जिल्ह्याला कला क्षेत्रात देशपातळीवर नावलौकिक मिळवून दिले.
या संदर्भात सविस्तर वृत्त असे की उत्तर प्रदेश राज्यातील झांसी येथील मनकर्णीका आर्ट गॅलरी तर्फे राष्ट्रीय पातळीवरील ऑनलाईन कला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या ऑनलाइन कला स्पर्धेत देशभरातल्या विविध राज्यांतील महीला कलाकांरानी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेत महिला कलाकारांनी एका पेक्षा एक सरस कलाकृती दाखल केल्या होत्या झांसी येथील मनकर्णीका आर्ट गॅलरीने फक्त महिला कलाकारांसाठी हा उपक्रम आयोजित केला होता डिसेंबर २०२४ मध्ये त्यांनी प्रत्येकी दोन प्रवेशीका मागवल्या होत्या टेड्रीशन आर्ट,कम्पोझीशीयन,पोट्रेड,लॅन्डस्केप होते मिनीयचर व माॅर्डन आर्ट कलेचा समावेश होता.
परभणी येथील ज्योतीर्मय इंग्लिश स्कूलच्या आदर्श कलाशिक्षीका सौ तृप्तजा कुलभुषण महाजण (दलाल) यांनी सादर केलेल्या कलाकृतीला या स्पर्धेत सिल्वर अवॉर्ड मिळाल्याने परभणी जिल्ह्याच नाव कला क्षेत्रात संपूर्ण देशात उंचावल असून सौ.तृप्तजा कुलभुषण महाजण (दलाल) या स्वतः एक अत्यंत होतकरू मेहनती कलाशिक्षाका म्हणून परिचित असून त्या कॅनव्हास वर्क नेहमीच करतात मनकर्णिका पाॅवर वूमन सिलव्हर अर्वाड स्पर्धेत त्यांच्या वुमन ॲन्ड रीयाच या चित्रास विशेष सन्मान मिळाल्याचा मॅसेज त्यांना मिळाला त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील कलाक्षेत्रात अक्षरशा आनंदाचे वातारवण निर्माण झाले व त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबीयांसह कला क्षेत्रातील शिक्षक/शिक्षकेतर कलावंत चाहत्यांकडून त्यांच्यावर अक्षरशः शुभेच्छांचा वर्षाव झाला सौ तृप्तजा कुलभुषण महाजण (दलाल) यांनी र,टि,चि,म १९९८/९९ या वर्षी कलाशिक्षक पदविका रितसर प्राप्त केली असून त्या सध्या पुर्ण वेळ कलाशिक्षीका म्हणून ज्योतीर्मय इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना कलेचे धडे देतात पुढील काही दिवसात पुणे/मुंबईत एकल चित्र प्रदर्शन करण्याचा त्यांचा मानस असून सध्या प्रदर्शनाचे काम पुर्णपणे प्रगतीपथा वर आहे.
उत्तर प्रदेश राज्यातील झांसी येथील मनकर्णीका आर्ट गॅलरीत सादर झालेल्या १८०० कलाकृतीत त्यांच्या कलाकृतीची निवड झाल्याने ही परभणीसह संपूर्ण जिल्ह्यासाठी तसेच परभणी जिल्ह्यातील सर्व कलाशिक्षकांसाठी निश्चितच अभिमानाची बाब म्हणावी लागेल त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे त्यांच्या वर्ग मैत्रीन असलेल्या मानवत येथील अपर्णा वसेकर,आसोलेकर यांच्यासह कलावंत प्रविण देशमुख यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत...
0 टिप्पण्या