🌟महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या......!


🌟दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30 उमेदवार आपटले,सगळ्यांचे डिपॉझिट जप्त🌟

💫 भाजपा दिल्लीत 27 वर्षांनंतर सत्तेवर , 27 वर्षांनंतर दिल्लीत कमळ फुलले , भाजपचा 70 पैकी 48 जागांवर दणदणीत विजय, अरविंद केजरीवालांसह आपच्या फायरब्रँड नेत्यांचा पराभव; 'आप'ला 22 जागा तर काँग्रेसला दिल्लीकरांकडून पुन्हा एकदा भोपळा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या झाडूच्या काड्या पार इस्कटल्या, पण सीएम आतिशींनी पक्षाची लाज राखली; कालकाजी मतदारसंघातून मिळवला विजय  अरविंद केजरीवालांना हरवनारे परवेश वर्मा  ठरले जायंट किलर

💫जनतेचा निर्णय आम्ही मान्य करतो, आम्ही आता सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावू; निवडणुकीतील पराभवानंतर  आपचे सर्वेसर्वा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया ; दिल्लीत  अहंकार आणि अराजकतेचा पराभव,  भाजपने निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया ; निवडणुकीत अरविंद केजरीवालांना आस्मान दाखवणारे परवेश वर्मा दिल्लीचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता,अमित शाहांच्या भेटीनंतर राजकीय घडामोडींना वेग 

💫एवढं प्रेम केलं तुमच्यावरती, तुम्ही रस्ता सोडून गेलात म्हणून नाईलाजास्तव बोलावे लागलं ; अरविंद केजरीवालांच्या पराभवानंतर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे ढसाढसा रडले ; अरविंद केजरीवालांच्या खोट्या राजकारणाचा बुरखा फाटला, दिल्लीतील विजयानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया ; भाजपने दिल्ली जिंकली, आता आम्ही मुंबईही ( महानगरपालिकाही ) जिंकू ; एकनाथ शिंदे यांची ' प्रतिक्रिया! 

💫दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30 उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त ; आकडेवारी बघितली असता INDIA आघाडी असती तर भाजपा 20 जागांवरही गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं! 

💫हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेचे खुले आव्हान 

💫अजित पवार म्हणाले, राज ठाकरेंना मुलालाही निवडून आणता आलं नाही, आता अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी अजून खूप लहान आहे; राज ठाकरेच त्यांना उत्तर देतील 

💫राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील ; आमदार किरण सामंत यांचं वक्तव्य  ; जयंत पाटील कपटी आणि नीच माणूस, आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करु, आमदार गोपीचंद पडळकर यांची जहरी टीका 

💫हिंगोलीत 1800 शेतकऱ्यांनी भरला बोगस पीक विमा, शासकीय जमिनीवरही काढला विमा, कृषी विभागाचे चौकशीचे आदेश 

💫मुख्याध्यापकाचा सहावीतील विद्यार्थिनीवर अत्याचार, नाशिकमध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना ; पोलीस हवालदाराचे टोकाचे पाऊल, राहत्या घरातच संपवली जीवन यात्रा, नागपुरातील घटना  

💫 विराट कोहली परतणार, रोहित शर्मा घेणार विश्रांती; कटकमधील दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 बदलणार  रणजी ट्रॉफीच्या तिसऱ्या क्वार्टरफायनलमध्ये हरियाणाच्या पोरांनी मुंबईला फोडला घाम, सूर्यकुमार, रहाणे सगळेच फेल; आता मुंबईपुढे करो या मरो! 

💫अनेक आयएमएस/आयपीएस घडवणारे ओझा सर दिल्लीत पराभूत,राजकारणात स्वत: 'राजा' होऊ शकले नाहीत

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या