🌟ब्लूमिंग किड्स पब्लिक स्कूलचे स्नेहसम्मेलन उत्साहात🌟
आपल्या मनोगतात दीपा बियानी पुढे म्हणाल्या की, वर्तमान युगात शाळेत किंवा महाविद्यालयात विद्यार्थियांना चांगले आणी व्यावहारिक शिक्षण मिळावे अशी अपेक्षा पालकवर्ग करतात. पण शिक्षणासोबत चांगले संस्कार शिकणे देखील तेवढेच महत्वाचे असते. आज आपले कुटुंब लहान - लहान होत चालले आहे. पूर्वी संयुक्त कुटुंब प्रणाली होती तेव्हा आई, आजी - आजोबा कढून खूप काही शिकायला मिळत असे. पण आज लहान कुटुंबात आई वडिलांना वेळ नाही. आज अनेक नाते कायमची हरपुन गेली आहेत. तेव्हा कुटुंबाचे महत्व टिकवणाऱ्या संस्कारीत अशा मुलांमूली निर्माण होणेही तेवढेच गरजेचे झालेले आहे. आपला कुटुंब, आपला समाज, आपली शाळा, आपला प्रांत आणी आपला देश अशा भावना विद्यार्थ्यांत रुजविले गेले पाहिजे. त्यासाठी पालकांची जवाबदारी मोठी आहे. कारण एखादा विद्यार्थी शाळेत शिक्षकांसोबत चार ते पाच तास घालवतो पण इतर शेष वेळ तो पालकांसोबतच असतो. म्हणून पालकांनी आपल्या पाल्यांच्या सर्वांगीण विकासात हातभार लावणे जास्त रास्त होईल, असे त्या म्हणाले. सरदार गुरबचनसिंघ सिलेदार यांनी आपल्या भाषणात विद्यार्थी तसेच पालकांना शिक्षण आणी कलागुण वृद्धि विषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी पत्रकार स. रविंदरसिंघ मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या जिवनात अभ्यासासोबतच स्नेहसम्मेलनाचे महत्व अधिक असल्याचे पटवून दिले. श्री सुहास बालाजीराव कल्याणकर यांनी विद्यार्थी आणी पालकांना शुभेच्छा दिल्या. शाळेच्या संचालिका हरजिंदरकौर सोहल यांनी प्रमुख अतीथींचे शॉल, पुस्तक आणी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले व आपल्या प्रस्ताविकात शाळेत सुरु असलेल्या उपक्रमांविषयी माहिती दिली. या स्नेहसम्मेलनाचे वैशिष्ट्य हे की विद्यार्थ्यांसोबत पालकांनी देखील नृत्य, स्पर्धा, खेळ आणी उपक्रमांत सहभाग घेतला. विजयेत्या पालकांचे शाळेतर्फे सत्कार करण्यात आले. चिमूकल्या मुलांमूलींनी वेगवेगळ्या गीतांवर नृत्य प्रस्तुत केले. यावेळी सरदार गुरदीपसिंघ गोरमनगर, जसप्रीतकौर गोरमनगर यांनी स्नेहसम्मलेनाचे सूत्र सांभळलें. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी क्रिष्टि कौशिक मित्रा यांनी केले. तर इशिका सालवे, सुखबीर सिंघ सोहल, ओम पत्तेवार, शुभम गायकवाड यांनी मोलाचे सहकार्य केले. स्नेह सम्मेलनात विद्यार्थी, पालक, आजी - आजोबा आणी मित्र परिवाराची उपस्थिती होती........
0 टिप्पण्या