🌟पुर्णा येथील २२ व्या बौद्ध धम्म परिषदेची उत्साहात सांगता......!


(दक्षिण कोरिया भन्तेना उपसंपदा विधी संपन्न झाल्याचे प्रमाण पत्र वितरण करण्यात आले)

🌟देश विदेश सह महाराष्ट्रातील भिक्खु संघ बौद्ध उपासक उपासिकां उपस्थितीत २२ बौद्ध धम्म परिषदेची सांगता🌟 


(
शाहीर संभा गाय गोधने सुकेशनी गायगोधने यांच्या कडून दक्षिण कोरिया भन्तेजी डॉ बाबासाहेबांचा अर्धाकृती पुतळा भेट देण्यात आला)

पुर्णा :- पुर्णा येथे दोन दिवशीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले त्या निमिताने दि १ फेब्रुवारी रोजी दक्षिण कोरिया च्या भन्तेची धनगर टाकळी येथे उपसंपदा शांती नगर येथे धम्म ध्वजारोहण डॉ आंबेडकर नगर येथे भोजनदान बौद्ध महिलेची धम्म दिक्षा दक्षिण कोरिया भन्तेना डॉ बाबासाहेबांना अर्धाकृती पुतळ्याची भेट व भिक्खु संघाची धम्मदेशना धम्म परिषदेत विविध ठराव समंत अशा विविध कार्यक्रम देश विदेश सह महाराष्ट्रातील भिक्खु संघ बौद्ध उपासक उपासिकां उपस्थितीत २२ बौद्ध धम्म परिषदेची सांगता झाली यामध्ये दक्षिण कोरिया च्या भन्ते उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते सकाळी ९.०० वाजता उपसंपदा विधी गोदावरी नदीच्या बेटावर मुख्य भिक्खु संघाच्या उपस्थितीत विधी पार पडला शहरातील शांतीनगर येथे भदंत शरणानंद महाथेरो यांच्या धम्म ध्वजारोहण करण्यात आले दुपारी डॉ आंबेडकर नगर येथे नगर सेवक उत्तम खंदारे यांच्या निवासस्थानी भिक्खु संघाला भोजनदान देण्यात आले दु २ वा धम्म परिषदेला अभिवादन त्रिशरण पंचशिल ग्रहण करून धम्मदेशना देण्यात आली त्या नंतर हिमायत नांदेड येथील मुस्लीम महिलेने बौद्ध धम्माची दिक्षा घेतली त्या महिलेला दिक्षा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

 त्या नंतर पूर्णा शहरातील शाहीर संभा गाय गोधने त्यांची कन्या सुकेशनी गोधने यांच्या कडून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धा कृती पुतळा दक्षिण कोरिया च्या भिक्खु संघाला भेट देण्यात आली भिक्खु संघाची धम्मदेशना संपन्न प्रकाश कांबळे यांनी विविध ठराव मांडले धम्म परिषदेची सांगता राष्ट्रगीताने संपन्न झाली सुत्र संचलन डॉ उपगुप्त महाथेरो आभार प्रदर्शन भन्ते बोधीधम्मा यांनी केले धम्म परिषद यशस्वीतेकरिता भन्ते पंयावंश प्रकाश कांबळे त्र्यंबक कांबळे राम भालेराव अतूल गवळी साहेबराव सोनवणे किशोर ढाकरगे अमृत कऱ्हाळे विजय बगाटे प्रशांत भालेराव श्रीकांत हिवाळे सेवानिवृत रेल्वे कर्मचारी भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी महिला मंडळाच्या पदाधिकारी सह दिलीप गायकवाड पीजी रणवीर आदिनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या