🌟संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास🌟
अयोध्या : उत्तर प्रदेश राज्यातल्या अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील मुख्य पुजारी आचार्य महंत सत्येंद्र दास यांचे बुधवारी वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पक्षाघाताचा झटका आल्यामुळे ३ फेब्रुवारी रोजी त्यांना सुरुवातीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र नंतर त्यांना लखनऊच्या एसजीपीजीआय रुग्णालयात आणण्यात आले. मंगळवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमधील रुग्णालयात येऊन त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती घेतली होती. सत्येंद्र दास गेल्या काही काळापासून मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा सामना करत होते बाबरी मशिदीचा ढाचा ६ डिसेंबर १९९२ रोजी पाडण्यात आला त्याच्या आधीपासूनच आचार्य सत्येंद्र दास राम मंदिरात पुजारी म्हणून काम करत होते.
0 टिप्पण्या