🌟पोलीस प्रशासनाला चकवा देत गनिमी काव्याने पुर्णा तालुक्यातील मौजे धानोरा (काळे) येथील गोदावरी नदीपात्रात जल समाधी आंदोलन🌟
पुर्णा :- परभणी जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवाचा तोंडचा घास निसर्गाने हिरावून घेतला स्वप्नाचा चुराडा झाला उदरनिर्वाह करणे कठीण झाले सोयाबीन,कापुस,मुग,उडीद या सारखे पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यात राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले पीक विमा कंपनी व जिल्हा प्रशासनाने पंचनामे पूर्ण केले जिल्ह्यातील सर्वच महसुलमंडळ अग्रिम रक्कमेस पात्र ठरली. असुन देखील अद्यापही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिनांक १८ जानेवारी रोजी मौजे धानोरा (काळे) येथील गोदावरी नदी पात्रात जल समाधी आंदोलन केले. चार तास पाण्यात राहिल्या नंतर जिल्हाधिकारी व पालकमंत्री महोदय यांनी आंदोलकांना शब्द देत मी अजित दादा यांना बोलुन राज्य सरकार कडे उर्वरित असलेली सबसिडी ९९ कोटी रुपये आठ दिवसात वर्ग करण्यास भाग पाडते आणि आठ दिवसात जिल्ह्यातील शेतकयांच्या खात्यात रक्कम जमा होईल असा शब्द दिला होता.
जल समाधी आंदोलन मागे घेऊन २३ दिवस झाले आहे. तरी अद्याप राज्य सरकारने पीक विमा कंपनीला ९९ कोटी थकीत असलेली सबसिडी दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात विमा जमा झालेला नाही. येत्या १९ फेब्रुवारी पर्यंत विमा मिळेल अशी अपेक्षा होती पण वीमा शेतकऱ्यांच्या खात्यात पडलेला नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना गुरुवार, दि. २० फेब्रुवारी २०२५ रोजी धानोरा काळे येथील गोदावरी नदी पात्रात आमरण उपोषण सुरू केले. यात काही जिवित हानी झाल्यास पीक विमा कंपनी व राज्य सरकार जबाबदार राहील.आंदोलक अशा घोषणा देत होते......
0 टिप्पण्या