🌟नांदेड रेल्वे स्थानकावरील नामफलकांच्या नावात दुरुस्ती करुन 'श्री हजुर साहेब नांदेड' असे फलक लावण्यात यावे...!


🌟दक्षिण मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापकांकडे बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची निवेदनाद्वारे मागणी🌟 


श्री हजुरी साहेब नांदेड :- महाराष्ट्र राज्यातील श्री हजुर साहेब नांदेड शहर दशमेशपिता साहिब श्री गुरु गोविंदसिंघजी यांच्या पवित्र चरणकमलांनी पावण झालेले शहर असून याठिकाणी शिख धर्माच्या पाच पवित्र तख्तांपैकी एक पवित्र तख्त श्री हजुर साहेब अबचलनगर नांदेड हे पवित्र तिर्थक्षेत्र असल्यामुळे सन २००८ यावर्षी झालेल्या श्री गुरुतागद्दी त्रिशताब्दी सोहळ्याचे औचित्य साधून भारतीय रेल्वे प्रशासनाने नांदेड रेल्वे स्थानकाच्या नावाला 'श्री.हजुर साहेब नांदेड' अशी मान्यता दिल्यानंतर देखील नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक कार्यालयाने या आदेशाची योग्य अंमलबजावणी केली नसल्याचे निदर्शनास येत असून सदरील रेल्वे स्थानकावरील नामफलकांवर आज देखील काही ठिकाणी केवळ शॉर्टकट मध्ये एनईडी तर काही ठिकाणी नांदेड तर काही ठिकाणी हुजुर साहेब नांदेड असेच नाव लिहिल्या जात असल्याने श्री.हजुर साहेब नांदेड येथील बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सरदार मनबीरसिंघ ग्रंथी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज गुरुवार दि.२० फेब्रुवारी रोजी दक्षिण मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक यांना लेखी स्वरूपात निवेदन देऊन श्री हजुर साहेब नांदेड रेल्वे स्थानकावरील चुकीच्या नामफलकांवरील नावात दुरुस्ती करुन सर्वत्र 'श्री हजुर साहेब नांदेड' असे फलक लावण्यात यावे अशी मागणी केली आहे.


बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की नांदेड रेल्वे स्थानकाचे नामफलक हे हुजूर साहेब असे नमुद आहे. त्या एवजी श्री हजुर साहेब नांदेड असे नाव नोंद करण्यात यावे. कारण या मध्ये शिख समाजाची धार्मिक भावना जुडल्यामुळे शिख समाजाच्या धार्मिक भावनांचा अनादर होत आहे त्यामुळे दक्षिण मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक साहेबांनी रेल्वे स्थानकावरील प्रत्येक नाफलकांची दुरुस्ती करुन हजुर साहेब एवजी श्री हजुर साहेब नांदेड अशा नावांची नोंद करावी असेही निवेदनात म्हटले असून या निवेदनावर बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सरदार मनबीरसिंघ ग्रंथी,बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष : स.भोलासिंघ भुजंगसिंघ गाडीवाले,स.मौलासिंघ,सचिव : स.प्रितपालसिंघ कमलसिंघ शाहु,स.बिरेंदरसिंघ नारायणसिंघ बेदी,स.जसपालसिंघ बलवंतसिंघ लाखवाले,स.जसपालसिंघ ग्यानसिंघ लांगरी,स.बक्षीससिंघ भिमसिंघ पुजारी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.......



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या