🌟दिल्ली शिख हत्याकांड प्रकरणात तत्कालीन राजकीय दहशतवादी सज्जन कुमार याला न्यायालयाने सुनावली जन्मठेप......!


🌟ॲव्हेन्यू कोर्टाचा निर्णय : शहिद पितापुत्र स.जसवंतसिंघ व स.तरुणदीपसिंघ यांना ४१ व्या वर्षी मिळाला न्याय🌟

नवी दिल्ली : दिल्लीत सन १९८४ यावर्षी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी हत्याकांडानंतर नियोजनबद्धररित्या दंगलसदृश परिस्थिती निर्माण करुन घडविण्यात आलेल्या निरपराध शिख धर्मियांच्या अमानुष हत्याकांड प्रकरणात काँग्रेस पक्षाचा दहशतवादी प्रवृत्तीचा माजी खासदार सज्जन कुमार याला दिल्लीतील ॲव्हेन्यू न्यायालयाने आज मंगळवार दि.२५ फेब्रुवारी रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे यापूर्वीच १२ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने सज्जन कुमार याला १ नोव्हेंबर १९८४ या दिवशी सरस्वती विहार या ठिकाणी झालेल्या वडील व मुलाच्या अमानुष हत्येप्रकरणी न्यायलायने दोषी ठरवलं होतं. त्यानंतर आज त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

पंजाब राज्यातील अमृतसर येथील पवित्र'अकाल तख्त' मध्ये दिवंगत इंदिरा गांधींनी केलेल्या ऑपरेशन ब्ल्यू स्टार कारवाई नंतर ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या झाडून हत्या केली त्यानंतर १ नोव्हेंबरच्या दिवशी राजधानी दिल्लीत 'खुन का बदला खुन'चा नारा देत राजकीय दहशतवाद्यांनी निरपराध शिख धर्मियांना लक्ष बनवून त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडवून या सुनियोजित हिंसाचारात निरपराध शीख धर्मिय लोकांसह त्यांच्या मालमत्तेला लक्ष्य करण्यात आले होते इंदिरा गांधींची गोळ्या घालून हत्या करणारे अंगरक्षक शिख धर्मिय असल्याने राजकीय दहशतवादी  सज्जन कुमार यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी शिखांविरोधात भयंकर दंगल भडकवण्याचे काम केले असा त्याच्यावर आरोप आहे. शिख विरोधी दंगलीनंतर १९९९ आणि २००४ च्या लोकसभा निवडणुकीतही सज्जन कुमार हा मोठ्या मताधिक्याने विजयी झाला होता.

१ नोव्हेंबर १९८४ रोजी उसळलेल्या दिल्ली दंगलीत सरस्वती विहारमध्ये स.जसवंत सिंग आणि स.तरुणदीप सिंग या दोन निरपराध शिख धर्मिय व्यक्तींची अमानुषपणे हत्या झाली. याप्रकरणी पीडितांच्या पत्नी आणि आईने या हत्या करणाऱ्यांचे नेतृत्व सज्जन कुमार करत होता असा आरोप केला होता. या प्रकरणी तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांनी चौकशीसाठी नेमलेल्या न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा आयोगासमोर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपला जबाब नोंदवला होता १४ फेब्रुवारी रोजी ॲव्हेन्यू कोर्टाने याप्रकरणी सज्जनकुमार याला दोषी ठरवले होते. आज याप्रकरणी शिक्षा ठोठावली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या