🌟देशात गेल्या १० वर्षांत आम्ही २५ कोटी जणांना दारिद्र्यरेषेबाहेर आणले गरीबांचा विकास आम्हीच केला -पंतप्रधान मोदी

 


🌟राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील उत्तरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा🌟

नवी दिल्ली : देशात गेल्या १० वर्षांत आम्ही २५ कोटी जणांना दारिद्र्यरेषेबाहेर आणले आहे. आम्ही गरीबांना खोटी आश्वासने दिली नाही तर त्यांचा खरा विकास आम्हीच केला, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील उत्तरात केला मोदी म्हणाले की, गेली ५० वर्षे आम्ही 'गरिबी हटाव'च्या घोषणा ऐकल्या गरीबांसाठी आम्ही खोट्या घोषणा केल्या नाहीत. आम्ही गरीबांचा खरा विकास केला. जमिनीवर राहून काम केल्यास बदल होतोच. आतापर्यंत ४ कोटी गरीबांना घरे मिळाली असून १२ कोटी जणांना घरात पाण्याच्या जोडणी मिळाल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

काहीजण गरीबांच्या झोपडीत जाऊन फोटोसेशन करतात राहुल गांधी यांचे नाव न घेता पंतप्रधान म्हणाले की, गरीबांच्या झोपडीत जाऊन काही जण फोटोसेशन करतात. मात्र, त्यांना संसदेत गरीबांबाबत बोलणे कंटाळवाणे वाटते. आम्ही मात्र गरीबांच्या प्रत्येक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत आहोत.केजरीवाल यांच्यावर टीका करताना पंतप्रधान म्हणाले की, काही लोकांच्या आलिशान घरांमध्ये जॅकुजी आणि शॉवर आहे. काही नेत्यांचे लक्ष त्यांच्या स्टायलिश बाथरुमवर आहे. आमचे लक्ष गरीबांचे घर बनवण्यावर आहे.

💫१२ लाखांपर्यंत प्राप्तिकर नाही :-

२०१४ पूर्वी देशातील नागरिकांच्या जीवनाची चाळण झाली होती. या जखमा भरत भरत आम्ही पुढे आलो. २०१३-१४ मध्ये २ लाखांपर्यंत करमाफी होती. ती १२ लाख करमाफीपर्यंत पोहोचली आहे. आता नोकरदारांना १३ लाख रुपयांपर्यंत कोणताही कर द्यावा लागणार नाही, असे मोदी म्हणाले.....

💫मुस्लिम महिलांना समानतेचा अधिकार दिला :-

आपली राज्यघटना भेदभाव करण्याचा अधिकार देत नाही. जे लोक खिशात राज्यघटना घेऊन फिरतात त्यांना हे कळणार नाही की मुस्लिम महिलांवर तुम्ही काय वेळ आणली होती. आम्ही तीन वेळा तलाकचा खात्मा केला आणि राज्यघटनेनुसार मुस्लिम महिलांना समानतेचा अधिकार दिला, असे मोदी म्हणाले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या