🌟नांदेड येथील पृथ्वी लॉन्स येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आदर्श धम्मसेवक श्रीकांत हिवाळे व श्यामराव जोगदंड यांना पुरस्कार प्रदान🌟
नांदेड :- नांदेड येथील लोकजागृती बहू उद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या कडुन दिला जाणारा राज्य स्तरीय धम्म सारथी पुरस्कार आंबेडकरी व धम्म चळवळीत सदैव अग्रेसर राहणारे व धम्म चळवळीला सदैव तन मन धनाने समर्पित योगदान देणारे आदर्श धम्मसेवक पुर्णा तालुका भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष तथा स्तंभ लेखक श्रीकांत हिवाळेसर व भारतीय बौद्ध महासभेचे परभणी दक्षिणचे माजी जिल्हाध्यक्ष श्यामराव जोगदंड यांना सन्मानपूर्वक धम्म सारथी पुरस्कार बहाल करण्यात आला.
नांदेड शहरातील पृथ्वी लॉन्स या ठिकाणी काल रविवार दि.०२ फेब्रुवारी २०२५ दुपारी १२.०० वाजता झालेल्या भव्य सन्मान सोहळ्यात सदरील पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक खुरगाव येथील श्रामनेर भिक्कू प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख भदंत पंय्याबोधी महाथेरो हे होते तर पुरस्कार गौरव सोहळ्याचे अध्यक्ष लोकजन शक्ती पार्टीचे प्रदेश महासचिव प्रशांत नंनवरे हे होते.
कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून प्रा.डॉ. संगीता घुगे ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध लेखिका माजी नगर सेविका करुणा जमधाडे सुभाष काटकांबळे व मुख्य आयोजक विजय शितळे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे स्वागतध्यक्ष म्हणून सोनूभाऊ संकपाळ होते.या सोहळ्यात बौद्ध वधू वर पालक परिचय महामेळावा सुद्धा संपन्न झाला यावेळी मोठ्या संख्येने वधुवर पालक उपस्तित होते या परिचय महामेळाव्यातून योग्य वधू वराची निवड होत असते. हा समाजाला दिशा दर्शक अशा उपक्रम आहे या उपक्रमातून जवळपास २०० विवाह पार पडले आहेत.
गौरव सोहळा पार पाडण्या साठी संयोजन समितीचे विजयकुमार शितळे राहुल पुंडगे अशोक हनवते गंगाधर दामोधर मिलिंद मुळे शेषराव हणमंते हेमा कांबळे शिला शीतळे महानंदा सूर्यवंशी आशा पाटील ललिता गंगातीर आदींनी परिश्रम घेतले........
0 टिप्पण्या