🌟सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्रींची प्रतिक्रिया : आमदार सुरेश धस यांच्या विधानावरही केली टिका🌟
🌟सोमनाथला पोलिसांनी ताब्यात घेवून अमानुषपणे मारहाण करावी व त्यातून त्याचा मृत्यू व्हावा हे मोठे दुर्देव🌟
परभणी : भिमसैनिक स्व.सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणात जवाबदार असलेल्या पोलिस अधिकारी-कर्मचार्यांना माफीचा प्रश्नच उद्भवत नाही त्या सार्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी न्याय मिळेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करु असा विश्वास मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्रींनी आज सोमवार दि.१० फेब्रुवारी रोजी प्रसार माध्यमांशी बोलतांना व्यक्त केला यावेळी आमदार सुरेश धस यांनी मन मोठे ठेवून पोलिस अधिकारी-कर्मचार्यांना माफ करावे, या आशयाच्या केलेल्या विधानावर देखील त्यांनी जोरदार टिका केली.
आमदार सुरेश धस यांनी या पध्दतीची विधाने करावीत हे आश्चर्यकारक आहे असे नमूद करीत सूर्यवंशी यांच्या मातोश्री श्रीमती सूर्यवंशी यांनी आपल्या पोटचा गोळा आपण गमावला आहे. अहोरात्र मेहनत करीत आम्ही कुटूंबियांनी त्यास शिकविण्याठी सर्वार्थाने प्रयत्न केले वकीलीची तो परिक्षा देणार होता त्याच्या माध्यमातून कुटूंबियांनी स्वप्न रंगवली होती त्यानेही भविष्यासंदर्भात स्वप्न रंगवली होती त्यास पोलिसांनी ताब्यात घेवून अमानुषपणे मारहाण करावी व त्यातून त्याचा मृत्यू व्हावा, हे मोठे दुर्देव आहे. कुटूंबियांच्या दृष्टीने तो मोठा धक्का आहे, त्यातून कुटूंबिय सावरलेले नाही, सावरणारसुध्दा नाही, त्याच्या मृत्यू प्रकरणातील संबंधित पोलिस अधिकारी-कर्मचार्यांना कठोर शिक्षा होईपर्यंत आम्ही लढू, असे त्या म्हणाल्या......
0 टिप्पण्या