🌟आग्या मोहोळाने केलेल्या हल्ल्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू : तर दोन मुले गंभीर जखमी....!


🌟हिंगोली जिल्ह्यातील जवळा बुद्रुक येथील दुर्दैवी घटना🌟 

✍️ शिवशंकर निरगुडे (हिंगोली)

हिंगोली :- हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक शिवारात शेतात हरभरा जमा करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर आग्या  मोहळाच्या मधमाशानी हल्ला  केला यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर दोन मुले गंभीर जखमी आहेत सदरील घटना दिनांक 26 सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे या घटनेमुळे सर्व गावावर शोककळ पसरली आहे.

 सेनगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील शेतकरी भास्कर नाथराव खिल्लारे वय 43 हे व त्यांची मुले धनंजय खिल्लारी धम्मदीप खिल्लारी यांच्यासोबत आज सकाळीच शेतात हरभरा काढणीच्या कामासाठी गेले होते सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तिघेही हरभरा काढण्यात व्यस्त असताना अचानक्या मोहोळाच्या मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला चढवला अचानक झालेल्या या हल्ल्यात तिघेही घाबरून गेले त्यांनी मधमाशा हटवण्याचा मात्र दहा ते बारा हजार मधमाश्याच्या पुढे त्यांना बचावाची संधी मिळाली नाही

यामध्ये भास्कर खिल्लारे हे गंभीर जखमी होऊन खाली कोसळले तर धम्मदीप खिल्लारी  गंभीर जखमी झाले या परिस्थितीतही धनंजय खिल्लारे यांनी गावात माहिती दिली सुनील खिल्लारे व नागोराव शिंदे यांनी शेतात जाऊन आग पेटवली त्यानंतर मधमाशा भास्कर खिल्लारी यांच्यापासून दूर झाल्या  लगेच यांना तातडीने उपचारासाठी हिंगोली येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यांची तपासणी वरून डॉक्टरांनी त्याना मृत घोषित केले धनंजय व धम्मदीप खिल्लारे यांच्यावर उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे मयत भास्कर यांच्या पश्चात आई-वडील पत्नी दोन मुले दोन मुली असा परिवार असल्याचे निकटवर्गीय मी सांगितलेली आहे आज महाशिवरात्री निमित्त ही घटना घडल्यामुळे सर्व गावावर शोककळ पसरली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या