🌟थकीत बिलांची देयक तात्काळ देण्यात यावी या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर निदर्शने🌟
परभणी : परभणी जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामविकास विभागातील शासकीय कामे करणारे ठेकेदार यांची २०२४-२५ या आर्थिक वर्षातील विविध लेखाशिर्षांतर्गत जवळपास ३५० कोटी रुपयांची देयके तातडीने वितरित करावी या मागणीसाठी बिल्डर असोसिएशनच्या परभणी शाखेतर्फे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.
शासनाकडे मोठ्या प्रमाणावर देयके प्रलंबित असतांना गेल्या सहा महिन्यात अत्यल्प प्रमाणात म्हणजे १० टक्के पेक्षा कमी निधी वितरित करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ठेकेदारांची मोठी आर्थिक कोंडी झाली असून कर्जबाजारीही झाले आहेत. त्यांच्यावर अवलंबून सर्व मजूर, कर्मचारी, पुरवठादार यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने या निदर्शनाची दखल घ्यावी व मार्च अखेरपर्यंत आवश्यक तेवढा निधी वितरीत करावा, अशी मागणी या ठेकेदारांनी केली.......
0 टिप्पण्या