🌟भिषण अपघातात ५ ठार तर ३५ जन गंभीर जखमी🌟
डांग : मध्य प्रदेश राज्यातील भाविकांची बस गुजरातच्या द्वारका येथून नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी निघाली असता डांग जिल्ह्यात एका खोल दरीत कोसळून झालेल्या हृदयविकारक भिषण अपघातात बसमधील ५ भाविकांचा मृत्यू तर ३५ भाविक गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली जखमींपैकी १७ जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहेत.
सापुतारा हिल स्टेशनजवळ बसचालकाचा बसवरील ताबा सुटला व बस दरीत कोसळली सदरील घटना रविवार दि.०२ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे ४.१५ वाजता घडली. जखमींना अहवा येथील सरकारी रुग्णालयात केले आहे. मृतांमध्ये बसचालकासह तीन पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. डांगचे जिल्हाधिकारी महेश पाटील यांनी सांगितले की, चार बसमधून हे प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी एक बस दरीत कोसळली. सापुतारा येथून निघाल्यानंतर ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्यातून ही घटना घडली. स्थानिक नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन बचावकार्य हाती घेतले. मृत बसचालकाचे नाव रतनलाल जाटव असून तो मध्य प्रदेशातील विदिशाचा रहिवासी आहे......
0 टिप्पण्या