🌟जम्मू जिल्ह्यातील अखनूर विभागात नियंत्रणरेषेवर लालोली विभागात 'आयईडी'चा स्फोट...!


🌟आयईडी स्फोटात सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद तर एक जवान जखमी🌟

श्रीनगर : जम्मू जिल्ह्यातील अखनूर विभागात नियंत्रणरेषेवर लालोली विभागात 'आयईडी'चा स्फोट झाला. यात लष्कराचे दोन जवान शहीद झाले असून एक जण गंभीर आहे. हा 'आयईडी' संशयित दहशतवाद्यांनी पेरला असावा असा संशय आहे.

 या स्फोटानंतर लष्कराने तातडीने शोधमोहीम हाती घेतली आहे. जखमी सैनिकांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, कॅप्टन के. एस. बक्षी व मुकेश अशी मृत जवानांची नावे आहेत. हे सैनिक गस्त घालत असताना हा स्फोट झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या