🌟महाशिवरात्रीनिमित्त शेवटच्या अमृत स्नानात त्रिवेणी संगमावर दीड कोटी लोकांनी डुबकी मारली🌟
प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये मागील ४५ दिवसांपासून सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याची काल बुधवार दि.२६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या शाही स्नानानंतर सांगता झाली महाकुंभमेळ्या दरम्यान त्रिवेणी संगमावर तब्बल ६५ कोटी भाविकांनी स्नान करत एका नव्या विक्रमाची नोंद केली.
सन २०१९ च्या कुंभमेळ्यात २४ कोटी लोकांनी संगमात डुबकी मारली होतीजगातील कोणत्याही कार्यक्रमात इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र आले नव्हते, त्यामुळे महाकुंभाच्या निमित्ताने एका जागतिक विक्रमाचीही नोंद झाली. उत्तर प्रदेश सरकारने यंदाच्या महाकुंभमेळ्यात ४५ कोटी भाविक येण्याचा अंदाज वर्तवला होता. पण प्रयागराजमध्ये यंदा तब्बल ६५ कोटींपेक्षा जास्त लोकांनी त्रिवेणी संगमात स्नान केले. याचाच अर्थ, सरासरी दीड कोटी भाविकांनी संगमात स्नान केल्याची आकडेवारी आहे. महाशिवरात्रीनिमित्त शेवटच्या अमृत स्नानात दीड कोटी लोकांनी डुबकी मारली.
महाशिवरात्रीच्या दिवशी संगमावर हजारो लोक शाही स्नान करण्यासाठी दाखल झाले होते. सकाळी ११ वाजेपर्यंत ७० लाखांहून अधिक लोकांनी तर दुपारी ४ वाजेपर्यंत सव्वा कोटी लोकांनी शाही स्नान केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सकाळी भाविकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली, त्यामुळे भाविकांना सुखद आनंदाचा धक्का बसला.महाकुंभमेळ्यात गेल्या ४५ दिवसात सहा प्रमुख पवित्र स्नान पार पडले. यामध्ये तीन शाही स्नान हे मकर संक्रांती, मौनी आमावस्या आणि वसंत पंचमीच्या दिवशी पार पडले. तर उर्वरित तीन स्नान हे पौष पौर्णिमा, माघी पौर्णिमा आणि महाशिवरात्रीला पार पडले.....
0 टिप्पण्या