🌟शेती माझी पिढी,शेती माझा वंशर क्तामध्ये अंश,मातीचाच - डॉ.ईद्रमणी
परभणी :- शेतीला माय मानून आपलं नित्याचं जीणं जगणारे आपण खरे हाडाचे शेतकरी व अधिकारी यांचा आज स्नेह मेळावा विजय जंगले प्रगतशील शेतकरी पेडगाव यांच्या संत्र्याच्या बागेमध्ये अतिशय उत्कृष्टपणे आयोजन केले होते,यामध्ये कुलगुरु डॉ.इंद्रमणी यांनी आपला शेतकरी राजा सुखी असावा यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करायलाच हवेत,असे सांगितले याचाच भाग म्हणून परभणी जिल्ह्यातील संवेदनशील, शेतीविषयी मनात कणव असणारे जिल्हा अधिकारी परभणी रघुनाथ गांवडे यांनी शेतकऱ्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासन दिले,आणि जवळपास 200 ते 250 शेतकरी आणि अधिकारी महिला आणि पुरुष यांचा स्नेह भेटीचा कार्यकम पार पडला.
शेतीविषयी समस्या जसे पांदन रस्ते व्यवस्थीत करून फळबागाईत व भाजीपाला व शेतीतील कामे त्यामुळे आधुनिक 'तंत्रज्ञान आपल्या शेतीमध्ये आपण वापरू शकु त्यामुळे शेतकऱ्यांचे चांगले, सकारात्मक दिवस येतील हे नक्की इथली शेती व शेतकरी टिकलेच पाहिजेत यासाठी आरटीओ श्रीकृष्ण नखाते आणि शिक्षण संचालक कृषी विद्यापीठ परभणी भगवान आसेवार सर यांनी आपले विचार मांडले . सदैव नव नविन प्रयोग पाहणे व ते शेतीमध्ये राबवणे यातच शेत कर्यांचे हित उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, प्रकल्प संचालक आत्मा परभणी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण, यांनी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त बायोगास कडे वळावे असे आव्हान केले,जिल्हा परिषद कृषी अधिकारी दीपक सामाले. डॉ. गजानन गडदे डॉ देशमुख. डॉ फुलारी डॉ. दिगंबर पटाईत डॉ. बी एम मोरे डॉ.नरवाडे अतिरिक्त शिक्षणाधिकारी गणेश शिंदे राजेश गर्जे,पत्रकार सुरज कदम. डॉ. जावळे,रत्नाकर ढगे,सहकुटुंब हजेरी लावली
या स्नेह मिलणातून शेतकरी व अधिकारी यांची जवळीक निर्माण होऊन एकंमेकाचा विचाराची देवान - घेवान झाली हे कार्यक्रम यशस्वी कार्यक्रमासाठी विजय जंगले, पंडितराव थोरात,जनार्धन आवरगंड, प्रकाश हरकळ,रामेश्वर साबळे विद्याधर संघई,रमेश राऊत,सजय ठोंबरे.शीवा ठोंबरे,अमोल गायकवाड,कृष्णा घुले,कुलदीप देशमुख,शंतनु देशमुख,सौ.सोनाली सौ. चव्हाण, प्रियंका सामाले,सौ.प्रफुला.सघई.सौ.मीरा आवरगंड,सौ.मीरा साबळे, सौ. अर्चना थोरात,सौ.सीमा जगले,सौ.स्वाती घोडके हे सर्व सहकुटुंब उपस्थित होते, पंचक्रोशीतील महिला पुरुष शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती... कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्वाती घोडके यांनी केले तर आभार जनार्धन आवरगंड यांनी मांडले......
➖➖➖➖➖➖
0 टिप्पण्या